भीमाशंकर ट्रेक व्हाया शिडीघाट

शेवटी आम्ही कर्जत भीमाशंकर ट्रेक पूर्ण करायचा मूहूर्त निश्चित केला. आधी ठरवलेली तारीख एका आठवड्याने पुढे ढकलल्यानंतर रविवार 15 मे ही तारीख निश्चित झाली. पण प्रत्यक्षात निघाले तिघेच जण… मुंबईतून मी, संदीप रामदासी आणि त्यांचा सहकारी गजानन उमाटे… तसं मंचरहून आम्ही आमच्या चॅनेलचा पुणे ग्रामीणचा प्रतिनिधी अविनाश पवार यालाही बोलवून घेतलं होतं. अविनाश एकटा न …

Rate this: