मी स्टार प्लसचा प्रेक्षक नाही, मात्र कामाचं ठिकाण स्टार हाऊसमध्येच असल्यामुळे स्टार प्लसचे नवीन प्रोग्राम कोणते, चॅनल नवीन काय करतंय, याची कल्पना असतेच. जुने-नवीन शो, त्यांना मिळणारा रिस्पॉन्स किंवा रेटिंग याचीही थोडीफार माहिती असतेच. 26 जानेवारीपासून स्टार प्लसवर अँथेम साँग सुरू झालं. तू ही तू… सगळ्यात पहिल्यांदा ते काय आहे, हेच कळत नव्हतं.