निवडणूक मग ती मुंबई महापालिकेची असो की बिहारच्या विधानसभेची… मराठीचा मुद्दा कुठेही केव्हाही कॅश होतो. आता राज्यातल्या 196 नगरपालिकांसह फेब्रुवारी मध्ये पंधरा महापालिकांच्या निवडणुका आहेत. शहरी भाग असल्याने मनसे आक्रमक होईल. त्याची नांदी गेल्या काही दिवसात दिसलीय. विहार निवडणुकीच्या काळात जशी राहुल गांधींनी सुरूवात केली तशी आता संजय निरूपम यांनी केलीय, त्यांनी दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांना …