सलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्‍याला सलाम,
न बघणार्‍याला सलाम,
विकत घेणार्‍याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणार्‍याला सलाम,
सलाम, भाई,
सबको सलाम.

Continue reading

Advertisements