सरलेल्या म्हणजे 2011 या वर्षाच्या गप्पा अजून किती दिवस मारायच्या… आताशा अनेक वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनेलांनी 2011 चा आढावा घेतला असेल, काही अजूनही घेत असतील… थोडक्यात काय तर … तुम चले जाओगे तो सोचेंगे… हम नें क्या खोया, क्या पाया…. (कृषिवल मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2012)
Tag Archives: NEWS
नो मोअर… अवरली बुलेटिन्स!
ई टीव्हीवर तासा-तासाला प्रसारीत होणारी बातमीपत्रे बंद करण्याचा निर्णय त्यांच्या व्यवस्थापनाने घेतला आणि बुलेटिन्स बंद झाली. या महिन्याच्या सात तारखेपासून… अवरली न्यूज अपडेटस् या ई टीव्हीचा अविभाज्य घटक होता, चॅनेल सुरू झालं तेव्हा म्हणजे जुलै 2000 पासून ही तासातासाची बातमीपत्रे प्रसारित व्हायची. ही वैशिष्ट्यपूर्ण बातमीपत्रे बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाचा अंतर्गत निर्णय.. बाहेरच्या कुणाला त्यात ढवळाढवळ …