सोपा आणि पिपा… हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे… सोपा म्हणजे SOPA आणि …
Tag Archives: NEW MEDIA
नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण
Change will not come if we wait for some other person or some other time. We are the ones we’ve been waiting for. We are the change that we seek. – बराक ओबामा सोशल नेटवर्किंगने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची आजपर्यंतची सर्व परिमाणेच बदलून टाकली. काही मोजक्या लोकांच्या पलिकडे अमेरिकेच्या संबंध जनतेला बराक ओबामा आणि त्याचं जगप्रसिद्ध …
‘फेसबुक’ ही तर संधी!
फेसबुक आता कात टाकतंय. गुगल प्लसच्या आगमनानंतर निर्माण होणार्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी फेसबुकने हे बदल सुरू केल्याची चर्चा इंटरनेट विश्वात आहे. गुगल प्लस फेसबुकच्या तुलनेत कुठेच नसलं तरी सर्च इंजिन म्हणून गुगलचं असलेलं स्थान फेसबुकला काळजी करायला लावणारं आहे. त्यामुळेच भविष्यातली स्पर्धा ओळखून फेसबुकने बदल सुरू केलेत. या बदलांनी आधीच्या फेसबुकला सरावलेले अनेक फेसबुकर बुचकाळ्यात …
अण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट
अण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. …
प्रत्येक माणूस एक स्टोरी
या विश्वातला प्रत्येक माणूस म्हणजे एक स्टोरी आहे.. त्याचं जगणं, त्याचं विचार करणं, त्यानंतर त्याचा संघर्ष, त्यातलं नाट्य सर्व काही भन्नाट आणि जगावेगळं, विलक्षण… फक्त आपण ते कधी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही, कारण सब घोडे बारा टक्के, ही आपली शिकवण… प्रचंड अशा दणकट असलेल्या या माणूस नावाच्या स्टोर्या काही अभिव्यक्त होतात, तरी काही तशाच …
व्हर्च्युअल नव्हे; लोकशाहीचा ‘रिअल’ स्तंभ!
(कृषिवलसाठी लिहिलेला लेख) न्यू मीडिया म्हणा किंवा वेब जर्नालिझम… हे माध्यमाचं एक तंत्रज्ञानाधिष्ठीत रूप.. पण अतिशय साधं. सोपं, सर्वांना सहज उपलब्ध होणारं आणि तरीही तुलनेनं स्वस्त.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संबंध माध्यम विश्वाचं भविष्य इंटरनेटची सुरूवात झाली तेव्हापासूनच न्यू मीडियाचा जन्म झाला, फक्त त्याचं न्यू मीडिया किंवा नवमाध्यम असं बारसं फार उशीरा झालंय.