मला रोज घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास करताना मुंबईच्या तिन्ही लोकल ट्रेनचा वापर करावा लागतो. म्हणजे नेरूळ ते कुर्ला हार्बर, त्यानंतर कुर्ला ते परळ सेंट्रल मेन आणि त्यानंतर एलफिन्स्टन रोड ते महालक्ष्मी असा वेस्टर्न लाईनचा प्रवास… महालक्ष्मी ते एलफिन्स्टन या प्रवासात ट्रेनमध्ये जागा असली तरी कधी बसण्याचा योग सहसा येत नाही. …