सबसे बडा रूपय्या!

रूपयाचा नवीन आलेलं नाणं पाहिलंत? स्टीलचं अतिशय लहान… आता पन्नास पैसे किंवा पाच रूपयाचं नाणं असू द्यात, आकारात कसलाच फरक नाही, तेव्हाच पहिल्यांदा पटलं की खरंच रूपया बारीक झालाय…

म्हणजे अगोदर अर्थशास्त्रज्ञ किंवा त्यासंदर्भातले जाणकार कितीही सांगत असले की रूपयाचं मूल्य कमी होतंय, त्यावर सहजासहजी विश्वास बसायचा नाही, पण आताचा रूपया पाहिला की रूपयाचं मूल्य कमी झाल्याची खात्री पटते.

रूपयाच्या नव्या नाण्यात आपण अलीकडेच स्वीकारलेलं रूपयाचं नवं चिन्ह मुद्राकिंत केलेलं आहे, आकाराला अतिशय छोटासा असा हा रूपया..
Continue reading

Advertisements

युद्धाचे आखाडे आता बदललेत…

जगात यापुढील तिसरं महायुद्ध कोणा-कोणात आणि कधी होईल… हे सांगता येईल नाही, पण चौथ्या महायुद्धाविषयी मात्र नक्की सांगता येईल, की ते कधीच होणार नाही.. कारण ते लढण्यासाठी कुणीच शिल्लक राहणार नाही… अशा आशयाचा एक कोट आहे… नेमक्या कोणत्या तत्वज्ञाचा की विचारवंताचा, आता नेमकं आठवत नाही
बहुतेक आईनस्टाईन असावेत.

हा कोट इथे देण्याचं कारण असं की जगाने आजवर फक्त दोनच महायुद्धे आणि त्यातली अपरिमीत हानी अनुभवलीय, पाहिलीय. त्यामुळे तिसरं महायुद्ध झालंच, तर पुन्हा चौथं महायुद्ध खेळण्यासाठी त्यावेळी कुणीच शिल्लक नसेल. हे मात्र सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे.
Continue reading

काळ्या पैश्याचं काळं वास्तव

देशपातळीवर अण्णा हजारेंचं आंदोलन आणि जन लोकपाल विधेयक याची चर्चा सुरू असतानाच राज्य सरकारने रात्री तब्बल दीडच्या सुमारास जलविधेयक मंजूर करवून घेतलं. त्यासाठी झोपलेल्या आमदारांना पुन्हा सभागृहात आणण्यात आलं. काही सभागृहातच होते कारण त्यादिवशी महिला आरक्षण दुरूस्ती विधेयकासाठी सभागृह उशीरापर्यंत सुरू होतं. राज्यातला पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम बदलणाऱ्या सरकारच्या या प्रयत्नावर मोठी टीका झाली, त्यानंतर सत्तेतला भागीदार पक्ष काँग्रेसला जाग आली आणि त्यांनी पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम बदलणार नसल्याचं स्पष्ट केलंय. हा सर्व घटनाक्रम वेगवेगळ्या वृत्तपत्रातून टीव्ही चॅनेलमधून येऊन गेलाय.
Continue reading

भारतामध्ये संकल्पनांचा दुष्काळ?

भारतीय टेलीव्हिजनवर सध्या जिकडे पाहावं तिकडे रिअॅलिटी शोचा दबदबा आहे, वेगवेगळ्या धाटणीचे शोंचा रतीब सर्वच चॅनेलांवर सुरूय. या सर्व रिअॅलिटी शो मध्ये साम्य काय तर सर्वच्या सर्व शो किंवा त्यांच्या मध्यवर्ती कल्पना या कोणत्या ना कोणत्या विदेशी चॅनेलवरून किंवा कार्यक्रमांवरून उचललेल्या असतात. अनेकदा त्या मूळ कार्यक्रमांचं किंवा कॉन्सेप्ट डिझायनरचं नावही बाइज्जत दिलं जातं.

तसं पाहिलं तर रिअॅलिटी टीव्हीचा खरे मानकरी ठरतात, ते म्हणजे न्यूज चॅनेल… जे काही चाललंय, ते सर्व खरंखुरं… याची देही याची डोळा. न्यूज चॅनेलच्या यशातच कुठेतरी रिअॅलिटी शोच्या यशस्वी होण्यामागचं कारण दडलेलं असावं… रिअॅलिटी शो साठी कुठलीही स्टोरी किंवा स्क्रीप्ट लागत नाही. सगळं काही उत्स्फूर्त… म्हणूनच ते प्रेक्षकांच्या अधिकाधिक जवळ जाणारं आणि त्यांना जास्तीत जास्त भावणारं असावं..
Continue reading