अण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट

अण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. […]

Rate this:

व्हर्च्युअल नव्हे; लोकशाहीचा ‘रिअल’ स्तंभ!

(कृषिवलसाठी लिहिलेला लेख) न्यू मीडिया म्हणा किंवा वेब जर्नालिझम… हे माध्यमाचं एक तंत्रज्ञानाधिष्ठीत रूप.. पण अतिशय साधं. सोपं, सर्वांना सहज उपलब्ध होणारं आणि तरीही तुलनेनं स्वस्त.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संबंध माध्यम विश्वाचं भविष्य इंटरनेटची सुरूवात झाली तेव्हापासूनच न्यू मीडियाचा जन्म झाला, फक्त त्याचं न्यू मीडिया किंवा नवमाध्यम असं बारसं फार उशीरा झालंय.

Rate this:

काळ्या पैश्याचं काळं वास्तव

देशपातळीवर अण्णा हजारेंचं आंदोलन आणि जन लोकपाल विधेयक याची चर्चा सुरू असतानाच राज्य सरकारने रात्री तब्बल दीडच्या सुमारास जलविधेयक मंजूर करवून घेतलं. त्यासाठी झोपलेल्या आमदारांना पुन्हा सभागृहात आणण्यात आलं. काही सभागृहातच होते कारण त्यादिवशी महिला आरक्षण दुरूस्ती विधेयकासाठी सभागृह उशीरापर्यंत सुरू होतं. राज्यातला पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम बदलणाऱ्या सरकारच्या या प्रयत्नावर मोठी टीका झाली, त्यानंतर सत्तेतला भागीदार […]

Rate this:

नुसतं फेसबुक स्टेटसवर लाईक करून किंवा कॉमेन्ट टाकून कसा देता येईल पाठिंबा?…

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. सरकारला आता त्यांच्या आंदोलनाचे चटके बसायला लागलेत. रात्रीच शरद पवार यांनी यासंदर्भातल्या मंत्रीस्तरीय गटाचा राजीनामा दिला. हे तसं तर अण्णांच्या आंदोलनाचं यश मानता येईल… पण त्यापेक्षा शरद पवारांचा राजकीय स्वार्थच त्यामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे. आज सरकारने लोकपाल विधेयकासंदर्भात अण्णा हजारेंच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, चर्चेच्या या […]

Rate this: