तुम्हाला कसलीही व्हिडिओ क्लिप पाहायची असेल तर तुम्ही काय करता. इंटरनेटवर जाऊन सरळ youtube.com असं टाईप करता. आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ पाहता. मग त्यामध्ये अख्खा सिनेमा असो की एखादा एमएमएस. किंवा एखाद्या नव्या, येऊ घातलेल्या सिनेमाचं गाणं किंवा प्रोमो पाहायचा असला तर तुमची पहिली पसंती असते यूट्यूब. (कृषिवल, मंगळवार 22 मे 2012)
Tag Archives: Google
जेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…
फेसबुकवर टाईमपास करणं तसं आपल्याकडे नवीन नाहीय. फेसबुक आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलंय. कृषिवलच्या मंगळवारसाठीच्या लेखासाठी काही तपशील अभ्यासत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं, तशी बातमी जुनी आहे, मात्र मला मराठी पेपरात कुठे पाहायला मिळाली नाही. कदाचित तुम्हाला माहिती असेल… पण फेसबुकचे विधायक उपयोग किती लोकविलक्षण असू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित …
एक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा
सोपा आणि पिपा… हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे… सोपा म्हणजे SOPA आणि …
कॉन्टेन्ट इज किंग!
SOPA आणि PIPA या दोन अँटीपायरसी कायद्यामुळे अमेरिकेतील वातावरण ढवळून निघायलंय. बुधवारी विकीपीडियासह रेडीट, वर्डप्रेस यासारख्या अनेक साईट्सनी आपला निषेध साईट बंद ठेऊन केला. त्यायामुळे या कायद्याच्या विरोधाला एक नवीन आयाम मिळाला. विरोध किती व्यापक आहे आणि कशासाठी आहे. याचीही चर्चा जगभर होतेय. तसं पाहिलं तर हे सर्व प्रकरण अमेरिकेतलं. कायदा करणार अमेरिकेची काँग्रेस. मग …
इंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल?
मागच्याच आठवड्यात याच स्तंभात लिहिलेल्या लेखात इंटरनेट हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असला तरी मूलभूत मानवाधिकार मात्र नक्कीच नाही, याची चर्चा केली होती. तसं आपल्यापैकी कित्येकांना फेसबुकशिवाय करमत नाही, अशी स्थिती आहे, पण सरकार किंवा न्यायालयीन कारवाईने फेसबुक कधी बंद झालं तर काय… विचार फारसा कुणी करणार नाही, कारण फेसबुक बंद झालं तर अजून …
सरत्या वर्षावर छाप अण्णांचीच…
लोकपाल आता दृष्टीक्षेपात आलंय, पण प्रत्यक्षात यायला अजून बराच अवकाश आहे. प्रत्यक्षात येईल की नाही हे अजूनही कुणी ठामपणे सांगत नाही. सरकारने सोमवारी लोकपालवर चर्चा केली. कदाचित आज किंवा उद्या ते संसदेत मांडलंही जाईल. संसद अधिवेशनाचा कालावधी वाढला जाण्याचीही शक्यता आहे. सरकारने फक्त लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यापुरतीच आपली जबाबदारी सीमित असल्याचाही दावा केलाय. म्हणजे लोकपाल …
माहितीला कुलूप, कल्पनांचा तुरूंगवास
सोशल नेटवर्किंगवरील प्रस्तावित सेन्सॉरशिप सध्या चर्चेचा विषय बनलीय. गेले तब्बल आठवडाभर या विषयावर चर्चितचर्वण सुरू आहे. आतापावेतो वेगवेगळ्या लोकांनी यावर वेगवेगळी मते आणि प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात. केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांच्या डोक्यात ही सुपीक आयडिया पहिल्यांदा आली आणि आपल्या पक्षनिष्ठेचा पुरावा म्हणून त्यांनी लागलीच ही आयडिया जाहीरही केली. अपेक्षेप्रमाणेच सिब्बल यांच्या या प्रस्तावाच्या विरोधात …
You must be logged in to post a comment.