दर्शनाला आलात? या.. पण या देवालयात, सध्या देव नाही गाभारा आहे, चांदीचे मखर आहे. सोन्याच्या समया आहेत, हिर्यांची झालर आहे. त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या पाहिलात ना तो रिकामा गाभारा? नाही..तसं नाही, एकदा होता तो तिथे काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा दोन …