अंबेजोगाईच्या नेटीझन्सचे विधायक पाऊल

अंबेजोगाईची एक बातमी आहे, तुम्ही जर फेसबुकवर असाल तर तुम्हाला माहितीच असेल, कदाचित. एव्हाना काही वृत्तपत्रांमध्येही येऊन गेली असेल. बातमी तशी साधीच आहे, तसं पाहिलं तर काही वेगळं नाही. फक्त फेसबुकचा वापर किती चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो, याचाच एक नमुना म्हणजे ही बातमी आहे. (कृषिवल, दिनांक 15/11/2011) Advertisements

Rate this:

नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण

आज आपल्याकडे ट्वीटरवर असलेले राजकारणी कोण कोणते, तर सर्वात पहिलं नाव येतं, शशी तरूर याचं. पण शशी तरूर हे राजकारणात येण्याआधीपासानूच ट्वीटरवर सक्रीय आहेत, एवढंच नाही तर सध्या त्यांची फॉलोअर्सची संख्या देशात सर्वाधिक आहे. सत्तेच्या राजकारणातून म्हणजे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रीपदावरून पायउचार झाल्यानंतरही ते ट्वीटरवर तेवढेच सक्रीय आहेत, जेवढे पूर्वी होते. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही सातत्याने वाढतेच […]

Rate this:

अण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा शेवट…

अण्णा हजारे यांनी आपला ब्लॉग बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट या ब्लॉगसाईटवर असलेला अण्णा हजारे सेज हा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय अण्णांनी आज राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसंच या ब्लॉगवर त्यांचे माजी अधिकृत ब्लॉगर राजू परूळेकर यांनी टाकलेलं पत्र आपली सही नसल्यामुळे अधिकृत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Rate this:

नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण

Change will not come if we wait for some other person or some other time. We are the ones we’ve been waiting for. We are the change that we seek. – बराक ओबामा सोशल नेटवर्किंगने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची आजपर्यंतची सर्व परिमाणेच बदलून टाकली. काही मोजक्या लोकांच्या पलिकडे अमेरिकेच्या संबंध जनतेला बराक ओबामा आणि त्याचं जगप्रसिद्ध […]

Rate this:

गुडबाय, गुगल बझ…!

आपल्याकडे सोशल नेटवर्किंग हा परवलीचा शब्द झाला, तो ऑर्कूटपासून… एक जमाना होता ऑर्कूटचा. ऑर्कूटवरचे स्क्रॅप हा एकेकाळी आपल्या दररोजच्या जगण्याचा एक भाग होता, फार जुनी गोष्ट नाही ही, झाली असतील फार फार तर पाचेक वर्षे… पण झुकरबर्गच्या फेसबुकने गूगलच्या ऑर्कूटला ओव्हरटेक केलं. फेसबुकच्या वाढत्या प्रभावाला तोंड देण्यासाठी ऑर्कूटने अनेक बदल केले; पण त्याचा फारसा उपयोग […]

Rate this:

‘फेसबुक’ ही तर संधी!

फेसबुक आता कात टाकतंय. गुगल प्लसच्या आगमनानंतर निर्माण होणार्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी फेसबुकने हे बदल सुरू केल्याची चर्चा इंटरनेट विश्वात आहे. गुगल प्लस फेसबुकच्या तुलनेत कुठेच नसलं तरी सर्च इंजिन म्हणून गुगलचं असलेलं स्थान फेसबुकला काळजी करायला लावणारं आहे. त्यामुळेच भविष्यातली स्पर्धा ओळखून फेसबुकने बदल सुरू केलेत. या बदलांनी आधीच्या फेसबुकला सरावलेले अनेक फेसबुकर बुचकाळ्यात […]

Rate this:

अडवाणींच्या ब्लॉगवर मोदी

मोदींचा सद्भावना उपवास सोमवारी संपला. संपलेला संपूर्ण आठवडा तसा मोदींचाच होता. शेवटचे तीन दिवस त्यांच्या उपवासाचे तर त्यापूर्वीचे काही दिवस अमेरिकेने प्रकाशित केलेल्या एका अहवालाचे. या अहवालात मोदींना पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार असल्याचा दावा करण्यात आला होता. अमेरिकी अभ्यासगटाचे प्रतिनिधी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी अजून अपरिपक्वअसल्याचा ठपका ठेवला. (कृषिवलमध्ये मंगळवारी{20/09/2011} […]

Rate this:

अण्णांचं आंदोलन आणि बार्शी

माझा प्रत्येक सोमवार हा बार्शीसाठी राखीव असतो. अण्णाचं आंदोलन अतिशय महत्वाच्या टप्प्यावर असतानाही मला कोर्टाच्या तारखेसाठी दर सोमवारप्रमाणेच कालही बार्शीला जावं लागलं. मी प्रत्येक रविवारी रात्री मुंबईतून बसतो आणि सोमवारी रात्री बार्शीतून निघून मंगळवारी सकाळी मुंबईत, पुन्हा कामाला हजर…

Rate this:

अण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट

अण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. […]

Rate this:

एक अनोखं सोशल नेटवर्किंग

मुंबईवर पुन्हा अतिरेकी हल्ला झाला. यावेळी अतिरेक्यांनी १३ जुलैचा बुधवार निवडला. तेरा तारखेवरून पुन्हा चर्चा सुरू झाल्या. कबुतरखाना दादर, ऑपेरा हाऊस आणि झवेरी बाजार परिसरात अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. टीव्ही वाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. व्हिज्युअल्ससाठी धावपळ… मग वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रत्यक्षदर्शींचे फोनो इंटरव्ह्यू, बाईट्स, पोलीस अधिकारी, राजकारण्यांच्या भेटी, रिपोर्टर्सचे वॉक थ्रू… सगळं काही ओघानेच. बॉम्बस्फोटानंतरचा […]

Rate this: