लोकपाल लटकलं ते लटकलंच… कुणी काहीही म्हणो, पण गुरूवारी मध्यरात्री राज्यसभेत जो काही तमाशा झाला, त्यामुळे सरकार पूर्णपणे उघडं पडलं… आता सरकारचे सर्व वरीष्ठ मंत्री म्हणजे प्रणबदा किंवा पवनकुमार बन्सल किंवा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही नारायण स्वामी यांनी कितीही सांगितलं की आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा लोकपाल सादर करणार, पण त्यावेळी काय होणार, याचा ट्रेलर सबंध …
Tag Archives: CORRUPTION
अण्णाचं ब्लॉगिंग… फक्त एकला चलो रे…
अण्णा हजारे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमधून आपली भूमिका स्पष्ट केलीय. आज त्यांनी ब्लॉगमधून राजकीय कट कारस्थान्यांबाबतीतली भूमिका स्पष्ट केलीय. आपल्या आंदोलनाबाबत राजकीय क्षेत्रामध्ये उलट सुलट चर्चा नेहमीच होत असतात, मी त्याकडे विशेष लक्ष देत नाही, असं सांगूनच अण्णांनी आपल्या ब्लॉगची सुरूवात केलीय. स्टार माझा मध्ये प्रकाशित
अडवाणींच्या ब्लॉगवर मोदी
मोदींचा सद्भावना उपवास सोमवारी संपला. संपलेला संपूर्ण आठवडा तसा मोदींचाच होता. शेवटचे तीन दिवस त्यांच्या उपवासाचे तर त्यापूर्वीचे काही दिवस अमेरिकेने प्रकाशित केलेल्या एका अहवालाचे. या अहवालात मोदींना पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार असल्याचा दावा करण्यात आला होता. अमेरिकी अभ्यासगटाचे प्रतिनिधी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी अजून अपरिपक्वअसल्याचा ठपका ठेवला. (कृषिवलमध्ये मंगळवारी{20/09/2011} …
अण्णांचं आंदोलन आणि बार्शी
माझा प्रत्येक सोमवार हा बार्शीसाठी राखीव असतो. अण्णाचं आंदोलन अतिशय महत्वाच्या टप्प्यावर असतानाही मला कोर्टाच्या तारखेसाठी दर सोमवारप्रमाणेच कालही बार्शीला जावं लागलं. मी प्रत्येक रविवारी रात्री मुंबईतून बसतो आणि सोमवारी रात्री बार्शीतून निघून मंगळवारी सकाळी मुंबईत, पुन्हा कामाला हजर…
अण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट
अण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. …
अरूणा रॉय धावल्या सरकारच्या मदतीला…
संसदेत मांडल्या गेलेल्या सरकारी लोकपाल विधेयकावर सर्वसामान्य जनतेच्या सूचना, प्रतिक्रिया आणि हरकती मागवणारी जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित झाली आणि आजच्या आजच राष्ट्रीय सल्लागार परिषद म्हणजेच नॅकच्या सदस्य अरूणा रॉय आपला एक लोकपाल विधेयकाचा मसुदा घेऊन पुढे आल्या. आता तो हा मसुदा संसदेच्या स्थायी समितीपुढे मांडणार आहेत. म्हणजेच आंदोलन बगैरे काही न करता त्यांना लोकपाल विधेयकाचा मसुदा …
अण्णांसोबतची जनशक्ती मतपेटीतून व्यक्त होईल?
अण्णा तीन दिवसांच्या तिहारमधील मुक्कामानंतर आज बाहेर पडले. खरं तर गेल्या दोन दिवसात तिहारबाहेर जमलेल्या लोकांचा समुदाय घटत असल्याचीही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली होती. काँग्रेसच्या अंतर्गत सुत्रांनी त्यावरून पुन्हा अण्णांना मोर्चेबांधमी सुरू केल्याच्या बातम्या येत होत्या, पण आज अण्णा तिहारमधून बाहेर पडल्यानंतर सगळंच चित्र पालटलं. अण्णांना मिळालेला प्रतिसाद फक्त अभूतपूर्व आणि सरकार तसंच दिल्ली पोलिसांसाठी अकल्पनीय …
Continue reading “अण्णांसोबतची जनशक्ती मतपेटीतून व्यक्त होईल?”
काळ्या पैश्याचं काळं वास्तव
देशपातळीवर अण्णा हजारेंचं आंदोलन आणि जन लोकपाल विधेयक याची चर्चा सुरू असतानाच राज्य सरकारने रात्री तब्बल दीडच्या सुमारास जलविधेयक मंजूर करवून घेतलं. त्यासाठी झोपलेल्या आमदारांना पुन्हा सभागृहात आणण्यात आलं. काही सभागृहातच होते कारण त्यादिवशी महिला आरक्षण दुरूस्ती विधेयकासाठी सभागृह उशीरापर्यंत सुरू होतं. राज्यातला पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम बदलणाऱ्या सरकारच्या या प्रयत्नावर मोठी टीका झाली, त्यानंतर सत्तेतला भागीदार …
…म्हणे निवडणूक लढवून दाखवा!
अण्णाचं उपोषण संपलं, अण्णा राळेगण सिद्धीमध्ये परतले, तिथं त्याचं जंगी स्वागत झालं. आता हळू हळू उपोषणाचा विषयही मागे पडतोय. मधल्या काळात आयपीएल आहे. 2G घोटाळ्यात आरोपपत्रही दाखल होऊ लागलेत. पुन्हा पाच राज्यातल्या निवडणुका आहेत… विषयांना काही तोटा नाही, पण मधल्या काळात चिडीचूप असलेल्या वाचाळ नेत्यांना आता वाचा फुटायला लागलीय. अण्णांच्या उपोषणाच्या काळात अण्णांना जो देशव्यापी …
नुसतं फेसबुक स्टेटसवर लाईक करून किंवा कॉमेन्ट टाकून कसा देता येईल पाठिंबा?…
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. सरकारला आता त्यांच्या आंदोलनाचे चटके बसायला लागलेत. रात्रीच शरद पवार यांनी यासंदर्भातल्या मंत्रीस्तरीय गटाचा राजीनामा दिला. हे तसं तर अण्णांच्या आंदोलनाचं यश मानता येईल… पण त्यापेक्षा शरद पवारांचा राजकीय स्वार्थच त्यामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे. आज सरकारने लोकपाल विधेयकासंदर्भात अण्णा हजारेंच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, चर्चेच्या या …
Continue reading “नुसतं फेसबुक स्टेटसवर लाईक करून किंवा कॉमेन्ट टाकून कसा देता येईल पाठिंबा?…”
You must be logged in to post a comment.