महायात्रा : वारी विधानसभेची II

महायात्रा : वारी विधानसभेची हा एबीपी माझाचा खास कार्यक्रम… 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आखण्यात आला होता. महाराष्ट्रातील सर्व सामान्य जननेचं प्रवासाचं साधन असलेल्या एसटी बसमधून सबंध महाराष्ट्र फिरायचा आणि जनतेच्या प्रश्नावर त्यांनी निवडून दिलेल्या किंवा निवडून देणार असलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करायची असा हा कार्यक्रम होता. या प्रकारच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला राज्यातल्या प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे संचलन करणाऱ्या कंडक्टर आणि बसचालकांची नावे घराघरात पोहोचली. तसंच निवडून आल्यानंतर सामान्य उमेदवारही कसा विदेशी बनावटी गाड्यांमधून फिरतो, आणि एसटीमध्ये बसणं हे लोकांच्या प्रतिनिधीला शान के खिलाफ वाटतं, त्याला लोकांच्या एसटीमध्ये बसलेलं पाहायलाही लोकांना आवडलं. त्यानंतर थेट पुढील म्हणजे 2014 च्या निवडणुकीलाच असा कार्यक्रम घेऊन येणं आम्हालाही जरा गैर वाटलं, थेट पाचवर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलो तर आम्ही आणि नेते यांच्यात फरक काय राहिला. म्हणूनच 2009 मध्ये एसटी मध्ये बसलेल्या नेत्यांनी तत्कालीन उमेदवारांनी दिलेल्या आश्वासनांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतला आणि 2012 मध्येच महायात्रा काढून विधानसभेवर वारी नेण्याचा निर्णय झाला. पंधरा दिवसात संबंध राज्यातून तब्बल चार हजार किलोमीटर्सचा प्रवास केला. आणि हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी तयार केला. कमी वेळ आणि जास्त अंतरामुळे काही जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व देणं शक्य झालं नाही. त्याबद्धल आमची दिलगिरी… 16 ऑगस्टपासून वारी विधानसभेची प्रसारीत होत आहे, 15 सप्टेंबरला त्याचा शेवटचा भाग प्रसारित झाला… महायात्रा : वारी विधान सर्व व्हिडिओ यूट्यूब प्लेलिस्टवर आहेतच त्याची लिंक

Continue reading

Advertisements