सबसे बडा रूपय्या!

रूपयाचा नवीन आलेलं नाणं पाहिलंत? स्टीलचं अतिशय लहान… आता पन्नास पैसे किंवा पाच रूपयाचं नाणं असू द्यात, आकारात कसलाच फरक नाही, तेव्हाच पहिल्यांदा पटलं की खरंच रूपया बारीक झालाय… म्हणजे अगोदर अर्थशास्त्रज्ञ किंवा त्यासंदर्भातले जाणकार कितीही सांगत असले की रूपयाचं मूल्य कमी होतंय, त्यावर सहजासहजी विश्वास बसायचा नाही, पण आताचा रूपया पाहिला की रूपयाचं मूल्य […]

Rate this:

दीपावली शुभेच्छा

माझ्या सर्व वाचकांना, ब्लॉगला फक्त भेट देऊन तो चाळणाऱ्यांना, सर्व मित्रांना, त्यांच्या परिवारांना, कुटुंबीयांना आणि सर्व परिचित तसंच अपरिचितांनाही दीपावलीच्या हार्दिक सुभेच्छा… दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांनीच दिल्या घेतल्या पाहिजेत, फक्त अट एकच आहे, त्यातली औपचारिकता टाळूयात, जमेल तितकी आणि शक्य होईल तितकं या औपचारिकतेला फाटा देऊयात, कारण आपल्याला कुठलीही निवडणूक लढवायची नाहीय की अन्य कुठेही जाऊन […]

Rate this:

देवाच्या दारीही शक्ती प्रदर्शन…!

या आठवड्यात बार्शीतला मुक्काम एक दिवसाने वाढला. सोमवारी रात्रीच निघायच्या ऐवजी मंगळवारी निघालो. अमावस्या होती. दुसऱ्या दिवशी घटस्थापना. आश्विन शुद्ध प्रतिपदा. माझी नेहमीची ट्रॅवल्स बस पकडण्यासाठी बार्शीमध्ये पोस्टाजवळच्या चौकात थांबलो. रिक्षावाल्याने मला त्या ठिकाणी सोडलं तरी मला रस्ता ओलांडून पलिकडच्या बाजूला पोहोचता येईना. कारण काय तर प्रचंड ट्रॅफिक. वेळ रात्री साडे अकरा-बारा वाजताची. यावेळीही बार्शीत […]

Rate this:

अण्णांचं आंदोलन आणि बार्शी

माझा प्रत्येक सोमवार हा बार्शीसाठी राखीव असतो. अण्णाचं आंदोलन अतिशय महत्वाच्या टप्प्यावर असतानाही मला कोर्टाच्या तारखेसाठी दर सोमवारप्रमाणेच कालही बार्शीला जावं लागलं. मी प्रत्येक रविवारी रात्री मुंबईतून बसतो आणि सोमवारी रात्री बार्शीतून निघून मंगळवारी सकाळी मुंबईत, पुन्हा कामाला हजर…

Rate this:

अरूणा रॉय धावल्या सरकारच्या मदतीला…

संसदेत मांडल्या गेलेल्या सरकारी लोकपाल विधेयकावर सर्वसामान्य जनतेच्या सूचना, प्रतिक्रिया आणि हरकती मागवणारी जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित झाली आणि आजच्या आजच राष्ट्रीय सल्लागार परिषद म्हणजेच नॅकच्या सदस्य अरूणा रॉय आपला एक लोकपाल विधेयकाचा मसुदा घेऊन पुढे आल्या. आता तो हा मसुदा संसदेच्या स्थायी समितीपुढे मांडणार आहेत. म्हणजेच आंदोलन बगैरे काही न करता त्यांना लोकपाल विधेयकाचा मसुदा […]

Rate this:

अण्णांसोबतची जनशक्ती मतपेटीतून व्यक्त होईल?

अण्णा तीन दिवसांच्या तिहारमधील मुक्कामानंतर आज बाहेर पडले. खरं तर गेल्या दोन दिवसात तिहारबाहेर जमलेल्या लोकांचा समुदाय घटत असल्याचीही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली होती. काँग्रेसच्या अंतर्गत सुत्रांनी त्यावरून पुन्हा अण्णांना मोर्चेबांधमी सुरू केल्याच्या बातम्या येत होत्या, पण आज अण्णा तिहारमधून बाहेर पडल्यानंतर सगळंच चित्र पालटलं. अण्णांना मिळालेला प्रतिसाद फक्त अभूतपूर्व आणि सरकार तसंच दिल्ली पोलिसांसाठी अकल्पनीय […]

Rate this:

K 2 S : एक अनुभव

कात्रज-सिंहगड नाईट ट्रेकचं आकर्षण तसं वर्षभरापासून होतं. म्हणजे आमची एक टीम या ट्रेकमध्ये गेल्या वर्षी सहभागी झाली. पुण्यातून परतल्यावर तब्बल महिनाभर तरी त्यांच्या बोलण्यात या ट्रेकशिवाय दुसरा विषयच नव्हता. उठताना, बसताना, जेवताना, चहा पिताना, ऑफिसला येताना, जाताना फक्त केटूएस.. सतत केटूएस केटूएस ऐकून कंटाळल्यावर मी ही पुढच्यावर्षी नक्की केटूएसला येणार, असं जाहीर करून टाकलं. पण […]

Rate this:

मग एसटी तोट्यात का जाते?

एसटी महामंडळ आणि त्यांच्या वाहतूक व्यवसायाविषयी मला अनेक प्रश्न पडलेत… हे फक्त काही त्रोटक आहेत. या विषयावर खूप लिहायचं आहे, आता माझं एक प्रामाणिक मत असं तयार झालंय की एसटी ही कधीच प्रवाश्यांच्या सेवेसाठी नव्हती किंवा नसते, तर ते फक्त एक एक सरकारी महामंडळ किंवा व्यवसाय आहे, हा व्यवसाय फक्त कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आणि या […]

Rate this:

वारी : एक आनंद यात्रा आणि बरंच काही

आज आषाढी एकादशी. पंचागाप्रमाणे देवशयनी एकादशी… म्हणजेच मोठी एकादशी… संबंध महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येनं भाविक पंढरपुरात दाखल होतात. विठ्ठल रखुमाईकडे अब्जावधींचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा खजिना असल्याचं अलीकडेच उघड झालं असलं तरी विठ्ठल हा तसा गरीबांचा देव. सगळे वारकरी हे शेतकरी किंवा शेतमजूर…

Rate this:

नापास तर शाळा झाल्यात….!

दहावीचा निकाल लागला. निकालादिवशी मी फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं. दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन… पास झालेल्यांचे सर्वजण अभिनंदन करतीलच, पण नापासाचं विशेष कौतुक… कारण त्यांनी शाळेला आपल्या शिक्षणात हस्तक्षेप करू दिलेला नाहीय.. यापूर्वी बारावीची परीक्षा झाली तेव्हाही मी असंच फेसबुक स्टेटस अपडेट केलं होतं… ते असं होतं… बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि न झालेल्याही सर्व […]

Rate this: