न्यायदानात तंत्रज्ञानाचा वापर

न्यायदानात तंत्रज्ञानाचा वापर हा तसा आपल्याकडे नवीन नाही. मुंबईवर हल्ला करणाऱ्यांमधील एकमेव जिवंत असलेला अतिरेकी अजमल कसाब याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनेच झाली. इतर सर्व क्षेत्राप्रमाणेच न्यायालयीन कामकाजात संगणकाचा वापर आता सर्वमान्य झालाय. इतकंच नाही तर न्यायालयाच्या साईटवर आजचं कामकाज उपलब्ध झालंय. मग अधिक खुलेपणाच्या बाजूने आणखी एक पाऊल टाकायला काहीच हरकत नसावी. Advertisements

Rate this:

एक अनोखं सोशल नेटवर्किंग

मुंबईवर पुन्हा अतिरेकी हल्ला झाला. यावेळी अतिरेक्यांनी १३ जुलैचा बुधवार निवडला. तेरा तारखेवरून पुन्हा चर्चा सुरू झाल्या. कबुतरखाना दादर, ऑपेरा हाऊस आणि झवेरी बाजार परिसरात अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. टीव्ही वाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. व्हिज्युअल्ससाठी धावपळ… मग वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रत्यक्षदर्शींचे फोनो इंटरव्ह्यू, बाईट्स, पोलीस अधिकारी, राजकारण्यांच्या भेटी, रिपोर्टर्सचे वॉक थ्रू… सगळं काही ओघानेच. बॉम्बस्फोटानंतरचा […]

Rate this:

प्रत्येक माणूस एक स्टोरी

या विश्वातला प्रत्येक माणूस म्हणजे एक स्टोरी आहे.. त्याचं जगणं, त्याचं विचार करणं, त्यानंतर त्याचा संघर्ष, त्यातलं नाट्य सर्व काही भन्नाट आणि जगावेगळं, विलक्षण… फक्त आपण ते कधी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही, कारण सब घोडे बारा टक्के, ही आपली शिकवण… प्रचंड अशा दणकट असलेल्या या माणूस नावाच्या स्टोर्या काही अभिव्यक्त होतात, तरी काही तशाच […]

Rate this:

एका भाषणाचा प्रवास…

म्यानमारच्या लष्करी राजवटीविरूद्ध एक महिला तब्बल तेवीस वर्षांपासून लढा देतेय. तिला अनेकदा तुरूंगवास झाला तर कित्येक वर्षे ती आपल्याच घरात नजरकैदेत होती. तिला नोबेल पुरस्कारही मिळालाय. तिचं नाव आंग सान स्यू की. नाव सगळ्यांना तोंडपाठ असेल. पण गेल्या आठवड्यात एक महत्त्वाची घटना झाली. ही घटना संबंधित आहे, तिच्या एका भाषणाशी. म्हणजे तिने एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या […]

Rate this:

डिजीटल फर्स्ट : लोकाभिमुख

पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक विचार सुरू झालाय. हा विचार आहे, डिजीटल फर्स्ट म्हणजे माहिती प्रसारणाची जी अनेक माध्यमे आहेत त्यामध्ये अग्रक्रम कोणाचा तर वेब मीडियाचा. वेब फर्स्ट न्यूजरूम ही संकल्पना त्यातूनच पुढे आलीय. म्हणजे कुठल्याही वृत्तपत्राची, टीव्ही चॅनेलची किंवा अन्य प्रसारमाध्यमाची वेबसाईट ही त्या माध्यमाला, व्यवसायाला किंवा संस्थेला फक्त पूरक न ठरता, ही […]

Rate this:

पाऊस आणि मीडिया

(हा लेख कृषिवलसाठी लिहिला होता, तो 14 जूनला प्रकाशित झाल्याचं सांगण्यात आलं, पण त्यांच्या नेटवर कुठेच आठळला नाही. हा लेख लिहित असताना मुंबईत नुकताच पाऊस सुरू झालेला होता. रामदेवबाबाचं आंदोलन गुंडाळलं गेलं होतं. आता फक्त माझ्या ब्लॉगवर पुन्हा अपलोड करतोय, एवढंच) मुंबईत पाऊस सुरू झाला तसा रामदेवबाबा आणि त्याचं आंदोलन मीडियातून हळू हळू ऑफस्क्रीन होत […]

Rate this:

सोशल नेटवर्किंगचे फंडे बदलणारं फेसबुक

फेसबुक या सोशल नेटवर्किंगचा जन्म अगदी काही वर्षांपूर्वीचा आहे, म्हणजे फेब्रुवारी २००४ मध्ये ही साईट लॉंच झाली. आज जगभरात ६०० मिलियनपेक्षाही जास्त नेटीझन्स फेसबुक वापरताहेत. ६०० मिलियन म्हणजे ६००० लाख म्हणजेच ६० कोटी. फेसबुक ही काही कुणा सामाजिक संघटनेची किंवा एखाद्या सरकारची वेबसाईट नाही, तर पूर्णपणे खाजगी आहे. पण या वेबसाईटने सोशल नेटवर्किंगचे सगळेच फंडे […]

Rate this:

व्हर्च्युअल नव्हे; लोकशाहीचा ‘रिअल’ स्तंभ!

(कृषिवलसाठी लिहिलेला लेख) न्यू मीडिया म्हणा किंवा वेब जर्नालिझम… हे माध्यमाचं एक तंत्रज्ञानाधिष्ठीत रूप.. पण अतिशय साधं. सोपं, सर्वांना सहज उपलब्ध होणारं आणि तरीही तुलनेनं स्वस्त.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संबंध माध्यम विश्वाचं भविष्य इंटरनेटची सुरूवात झाली तेव्हापासूनच न्यू मीडियाचा जन्म झाला, फक्त त्याचं न्यू मीडिया किंवा नवमाध्यम असं बारसं फार उशीरा झालंय.

Rate this:

तंत्रज्ञानाचा पत्रकारितेवर परिणाम

(विमर्श – या ठाण्यातून प्रकाशित होणाऱ्या त्रैमासिकासाठी हा लेख लिहिला होता…) टाईम्स ऑफ इंडियाच्या 17 डिसेंबरच्या अंकातली एक बातमी आहे. कॉम्प्युटर्स इमेजेस म्हणजेच व्हर्चुअल अँकर्स लवकरच खऱ्याखुऱ्या अँकर्सची जागा घेतील. अमेरिकेतल्या नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातल्या मॅककॉर्मिक स्कूल ऑफ इंजिनीयरिंग अँड अप्लाईड सायन्सेसच्या इंटेलिजेन्ट इन्फॉर्मेशन लॅब म्हणजे इन्फोलॅबमध्ये व्हर्च्युअल अँकर प्रोजेक्टवर काम सुरू आहे… टेक्स्ट अँड स्पीच टेक्नॉलॉजीवर […]

Rate this: