इंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल?

मागच्याच आठवड्यात याच स्तंभात लिहिलेल्या लेखात इंटरनेट हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असला तरी मूलभूत मानवाधिकार मात्र नक्कीच नाही, याची चर्चा केली होती. तसं आपल्यापैकी कित्येकांना फेसबुकशिवाय करमत नाही, अशी स्थिती आहे, पण सरकार किंवा न्यायालयीन कारवाईने फेसबुक कधी बंद झालं तर काय… विचार फारसा कुणी करणार नाही, कारण फेसबुक बंद झालं तर अजून […]

Rate this:

इंटरनेट : जीवनावश्यक आहे, पण मूलभूत नक्कीच नाही

एक चर्चा सुरू झालीय, पाश्चिमात्य देशांमध्ये… तशी ही चर्चा आपल्याकडे यायला अजून वेळ आहे. इंटरनेटच्या 3G स्पीडमुळे कदाचित सुरू होईलही आपल्याकडे लवकरच…. इंटरनेट हा मानवाधिकार असावा का, म्हणजे मूलभूत मानवी हक्काचा दर्जा देण्याइतपत त्याचं महत्व असावं. तसं पाहिलं तर इंटरनेटचं महत्व आज कुणालाच अनुल्लेखित करता येणार नाही. कारण इंटरनेटची माहिती आणि संदेशवहनाची क्षमता अफाट आहे. […]

Rate this:

वाढत्या लोकांक्षाचं वर्ष 2011

सरलेल्या म्हणजे 2011 या वर्षाच्या गप्पा अजून किती दिवस मारायच्या… आताशा अनेक वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनेलांनी 2011 चा आढावा घेतला असेल, काही अजूनही घेत असतील… थोडक्यात काय तर … तुम चले जाओगे तो सोचेंगे… हम नें क्या खोया, क्या पाया…. (कृषिवल मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2012)

Rate this:

सोशल नेटवर्किंगवर निर्बंध घालण्यापूर्वी….

इन बंद कमरों में मेरी सॉंस घुटी जाती है खिडकियॉं खोलता हूँ तो जहरीली हवा आती है प्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्वर यांनी आपल्या ‘कितनें पाकिस्तान’ या कादंबरीची सुरुवात या ओळींनी केलीय. या ओळी कुणाच्या याचा उल्लेख त्यांनी त्यामध्ये केलेला नाही. नंतरही माझ्या वाचनात त्या ओळी आलेल्या नाही. आता इथे त्याचा संदर्भ देण्याचा हेतू एवढाच की, […]

Rate this:

सरत्या वर्षावर छाप अण्णांचीच…

लोकपाल आता दृष्टीक्षेपात आलंय, पण प्रत्यक्षात यायला अजून बराच अवकाश आहे. प्रत्यक्षात येईल की नाही हे अजूनही कुणी ठामपणे सांगत नाही. सरकारने सोमवारी लोकपालवर चर्चा केली. कदाचित आज किंवा उद्या ते संसदेत मांडलंही जाईल. संसद अधिवेशनाचा कालावधी वाढला जाण्याचीही शक्यता आहे. सरकारने फक्त लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यापुरतीच आपली जबाबदारी सीमित असल्याचाही दावा केलाय. म्हणजे लोकपाल […]

Rate this:

माहितीला कुलूप, कल्पनांचा तुरूंगवास

सोशल नेटवर्किंगवरील प्रस्तावित सेन्सॉरशिप सध्या चर्चेचा विषय बनलीय. गेले तब्बल आठवडाभर या विषयावर चर्चितचर्वण सुरू आहे. आतापावेतो वेगवेगळ्या लोकांनी यावर वेगवेगळी मते आणि प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात. केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांच्या डोक्यात ही सुपीक आयडिया पहिल्यांदा आली आणि आपल्या पक्षनिष्ठेचा पुरावा म्हणून त्यांनी लागलीच ही आयडिया जाहीरही केली. अपेक्षेप्रमाणेच सिब्बल यांच्या या प्रस्तावाच्या विरोधात […]

Rate this:

संदीप रामदासींचा ब्लॉग (sandeepramdasi.com)

एफडीआयची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. सरकारने रिटेल म्हणजेच किरकोळ दुकानदारीचं क्षेत्र थेट परकीय गुंतवणुकीसाठी खुलं केलंय, तसं हे क्षेत्रं आधीही खुलं होतंच. पण त्यावर मर्यादा होती. सिंगल ब्रँडसाठी आधी ही मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत होती, म्हणजे नोकियासारख्यांना भारतात त्यांची उत्पादने विक्रीसाठी ठेवायची तर त्यासाठी भारतीय उत्पादक शोधावा लागे, आता त्यांची मर्यादा 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलीय. […]

Rate this:

सोशल नेटवर्किंग : भान जबाबदारीचं

फेसबुक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तसं ते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतंच. फेसबुक म्हणजे सोशल नेटवर्किंग हे तर आता सगळ्या भारत वर्षाला ठाऊक आहे. जगभरात 80 कोटीपेक्षाही जास्त जण फेसबुकवर आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतेच आहे. लवकरच म्हणा किंवा येत्या काही वर्षात भारताच्या लोकसंख्येएवढी फेसबुक प्रोफाईल्सची संख्या असेल. (कृषिवल, मंगळवार, दिनांक 22/12/2011)

Rate this:

अंबेजोगाईच्या नेटीझन्सचे विधायक पाऊल

अंबेजोगाईची एक बातमी आहे, तुम्ही जर फेसबुकवर असाल तर तुम्हाला माहितीच असेल, कदाचित. एव्हाना काही वृत्तपत्रांमध्येही येऊन गेली असेल. बातमी तशी साधीच आहे, तसं पाहिलं तर काही वेगळं नाही. फक्त फेसबुकचा वापर किती चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो, याचाच एक नमुना म्हणजे ही बातमी आहे. (कृषिवल, दिनांक 15/11/2011)

Rate this:

नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण

आज आपल्याकडे ट्वीटरवर असलेले राजकारणी कोण कोणते, तर सर्वात पहिलं नाव येतं, शशी तरूर याचं. पण शशी तरूर हे राजकारणात येण्याआधीपासानूच ट्वीटरवर सक्रीय आहेत, एवढंच नाही तर सध्या त्यांची फॉलोअर्सची संख्या देशात सर्वाधिक आहे. सत्तेच्या राजकारणातून म्हणजे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रीपदावरून पायउचार झाल्यानंतरही ते ट्वीटरवर तेवढेच सक्रीय आहेत, जेवढे पूर्वी होते. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही सातत्याने वाढतेच […]

Rate this: