काळ्या पैश्याचं काळं वास्तव

देशपातळीवर अण्णा हजारेंचं आंदोलन आणि जन लोकपाल विधेयक याची चर्चा सुरू असतानाच राज्य सरकारने रात्री तब्बल दीडच्या सुमारास जलविधेयक मंजूर करवून घेतलं. त्यासाठी झोपलेल्या आमदारांना पुन्हा सभागृहात आणण्यात आलं. काही सभागृहातच होते कारण त्यादिवशी महिला आरक्षण दुरूस्ती विधेयकासाठी सभागृह उशीरापर्यंत सुरू होतं. राज्यातला पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम बदलणाऱ्या सरकारच्या या प्रयत्नावर मोठी टीका झाली, त्यानंतर सत्तेतला भागीदार […]

Rate this:

…म्हणे निवडणूक लढवून दाखवा!

अण्णाचं उपोषण संपलं, अण्णा राळेगण सिद्धीमध्ये परतले, तिथं त्याचं जंगी स्वागत झालं. आता हळू हळू उपोषणाचा विषयही मागे पडतोय. मधल्या काळात आयपीएल आहे. 2G घोटाळ्यात आरोपपत्रही दाखल होऊ लागलेत. पुन्हा पाच राज्यातल्या निवडणुका आहेत… विषयांना काही तोटा नाही, पण मधल्या काळात चिडीचूप असलेल्या वाचाळ नेत्यांना आता वाचा फुटायला लागलीय. अण्णांच्या उपोषणाच्या काळात अण्णांना जो देशव्यापी […]

Rate this:

का उभा राहिला देश अण्णांच्या मागे?

अण्णांनी उपोषण सोडलं. अण्णांनी उपोषण सोडावं यासाठी प्रयत्न करणारांनाही आता हायसं वाटलं असेल. उपोषण सोडल्यानंतर अण्णांनीही जाहीर केलंय की ही तर फक्त एक लढाई होती, म्हणजे सरकारला जनलोकपालासाठीच्या मसुदा समितीसाठी राजी करणं ही साधी बाब नाही. पण आता जन लोकपालचा मसुदा तयार होताना समितीतल्या सर्वांनाच जागरूक रहावं लागणार आहे, या समितीत सर्वच जण थोर जाणते […]

Rate this:

नुसतं फेसबुक स्टेटसवर लाईक करून किंवा कॉमेन्ट टाकून कसा देता येईल पाठिंबा?…

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. सरकारला आता त्यांच्या आंदोलनाचे चटके बसायला लागलेत. रात्रीच शरद पवार यांनी यासंदर्भातल्या मंत्रीस्तरीय गटाचा राजीनामा दिला. हे तसं तर अण्णांच्या आंदोलनाचं यश मानता येईल… पण त्यापेक्षा शरद पवारांचा राजकीय स्वार्थच त्यामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे. आज सरकारने लोकपाल विधेयकासंदर्भात अण्णा हजारेंच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, चर्चेच्या या […]

Rate this:

नो मोअर… अवरली बुलेटिन्स!

ई टीव्हीवर तासा-तासाला प्रसारीत होणारी बातमीपत्रे बंद करण्याचा निर्णय त्यांच्या व्यवस्थापनाने घेतला आणि बुलेटिन्स बंद झाली. या महिन्याच्या सात तारखेपासून… अवरली न्यूज अपडेटस् या ई टीव्हीचा अविभाज्य घटक होता, चॅनेल सुरू झालं तेव्हा म्हणजे जुलै 2000 पासून ही तासातासाची बातमीपत्रे प्रसारित व्हायची. ही वैशिष्ट्यपूर्ण बातमीपत्रे बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाचा अंतर्गत निर्णय.. बाहेरच्या कुणाला त्यात ढवळाढवळ […]

Rate this:

भारतामध्ये संकल्पनांचा दुष्काळ?

भारतीय टेलीव्हिजनवर सध्या जिकडे पाहावं तिकडे रिअॅलिटी शोचा दबदबा आहे, वेगवेगळ्या धाटणीचे शोंचा रतीब सर्वच चॅनेलांवर सुरूय. या सर्व रिअॅलिटी शो मध्ये साम्य काय तर सर्वच्या सर्व शो किंवा त्यांच्या मध्यवर्ती कल्पना या कोणत्या ना कोणत्या विदेशी चॅनेलवरून किंवा कार्यक्रमांवरून उचललेल्या असतात. अनेकदा त्या मूळ कार्यक्रमांचं किंवा कॉन्सेप्ट डिझायनरचं नावही बाइज्जत दिलं जातं. तसं पाहिलं […]

Rate this:

स्टार प्लसच्या अॅन्थेम साँगच्या निमित्ताने…

मी स्टार प्लसचा प्रेक्षक नाही, मात्र कामाचं ठिकाण स्टार हाऊसमध्येच असल्यामुळे स्टार प्लसचे नवीन प्रोग्राम कोणते, चॅनल नवीन काय करतंय, याची कल्पना असतेच. जुने-नवीन शो, त्यांना मिळणारा रिस्पॉन्स किंवा रेटिंग याचीही थोडीफार माहिती असतेच. 26 जानेवारीपासून स्टार प्लसवर अँथेम साँग सुरू झालं. तू ही तू… सगळ्यात पहिल्यांदा ते काय आहे, हेच कळत नव्हतं.

Rate this:

अनागोंदी…

राज्यातल्या तेल, वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू… जीवनावश्यक वस्तू यांमध्ये भेसळ करणारे माफिया, टोलसम्राट, लाचखोर, अवैध वाहतूक करणारी धेंडं, मंत्रालयात आणि इतरत्र आपल्या ऑफिसात बसून लाच खाणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचं मनापासून मानणारे सरकारी-निमसरकारी कर्मचारी, त्यांना लाचलुचपतीच्या जाळ्यात पकडणारे एसीबीवाले, शिवाय नाक्यानाक्यावर वसुली करणारे पोलीस या सर्वांनी कसलेच पैसे खायचे नाहीत, कसलीच भेसळ करायची नाही असं […]

Rate this:

महाराष्ट्र सरकारचे अठरा लाख स्वच्छ कर्मचारी?

काल गुरूवारी राज्यातल्या तब्बल 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. त्यांना नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांच्या जळीतकांडाचा निषेध करायचा होता, त्यांचा संताप समजण्याजोगा आहे. सोनावणे यांच्या हत्येचा निषेध केलाच पाहिजे. आपल्याकडे फक्त मंत्रालयच नाही तर जिल्ह्या-जिल्ह्यात, तालुक्या-तालुक्यात महसूल आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून आपला निषेध नोंदवला. त्यांचा एक सहकाऱ्याची हत्या […]

Rate this: