राज्यात शालेय शिक्षणाच्या सुरू असलेल्या खेळखंडोब्यावर शनिवारी शिक्षण अधिकार समन्वय समिती पुण्यात आंदोलन करणार आहे… त्यासंदर्भातली एक लिंक मी फेसबुकवर शेअर केली होती. त्याला काही चांगल्या प्रतिक्रिया आल्या. ज्येष्ठ सनदी अधिकारी लीना मेहेंदळे यांचाही या उपक्रमाला पाठिंबा आहे.. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत.
Author Archives: मेघराज पाटील
सुनंदा पुष्कर आणि कळसूबाई शिखर…
कळसूबाई शिखर आणि सुनंदा पुष्कर यांच्यात तसं काहीच नातं नाहीय… असण्याचं कारणही नाही… नाही म्हणायला, सुनंदा पुष्कर जेव्हा भावी पतीसोबत म्हणजे शशी तरूर यांच्याबरोबर शिर्डी आणि शनी शिंगणापूरला आल्या होत्या तेव्हा त्यांना याच जिल्ह्यात असलेल्या कळसूबाई शिखराची माहिती कुणीतरी दिली असण्याची शक्यता आहे… तेवढाच काय तो संबंध फार तर बादरायण म्हणा हवं तर..
तंत्रज्ञानाचा पत्रकारितेवर परिणाम
(विमर्श – या ठाण्यातून प्रकाशित होणाऱ्या त्रैमासिकासाठी हा लेख लिहिला होता…) टाईम्स ऑफ इंडियाच्या 17 डिसेंबरच्या अंकातली एक बातमी आहे. कॉम्प्युटर्स इमेजेस म्हणजेच व्हर्चुअल अँकर्स लवकरच खऱ्याखुऱ्या अँकर्सची जागा घेतील. अमेरिकेतल्या नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातल्या मॅककॉर्मिक स्कूल ऑफ इंजिनीयरिंग अँड अप्लाईड सायन्सेसच्या इंटेलिजेन्ट इन्फॉर्मेशन लॅब म्हणजे इन्फोलॅबमध्ये व्हर्च्युअल अँकर प्रोजेक्टवर काम सुरू आहे… टेक्स्ट अँड स्पीच टेक्नॉलॉजीवर …
मास्तर
मास्तर, सातत्याने देतच राहिले… हे जग सोडून गेल्यावरही त्यांनी आपल्या पार्थिवाचं विद्युतदाहिनीत दहन करण्याऐवजी वैद्यकीय संशोधनासाठी दान केलं. हयातीतच त्यांनी आपलं सर्व काही – म्हणजे सदाशिवातलं राहतं घर, पुस्तकं आणि ज्याला रूढ अर्थाने संपत्ती म्हणता येईल असं सर्व काही साधना ट्रस्टला देऊन टाकलं.
पंतप्रधानपद नाकारणारा नेता
कॉमरेड ज्योती बसू भारताचे पहिले कम्युनिस्ट पंतप्रधान झाले असते. नियतीने म्हणा किंवा या देशाच्या राजकीय समीकरणातून त्यांना ही संधी मिळाली होती. पण सबंध पश्चिम बंगालमधलं सबंध राजकारणच केवळ काँग्रेस विरोध, त्यातल्या त्यात केंद्रातल्या सत्तेकडून सातत्याने डावलल्याचा आभास यावरच आधारित असल्यामुळे डाव्या पक्षांचा या प्रस्तावाला होकार मिळणं कधी शक्यच नव्हतं. म्हणूनच देशाला कम्युनिस्ट पंतप्रधान मिळाला असता …
लातूरची पंचविशी
मुंबईहून बार्शीमार्गे लातूरला गेलात की एक भव्य उड्डाणपूल तुमचं स्वागत करतो , लातूर या मराठवाड्यातल्या शहराविषयीचा तुमचा दृष्टीकोन बदलून टाकतो. उड्डाणपुलाच्या अगोदरच तुम्हाला एमआयडीसी लागते , आणि लातूर आल्याची जाणीव करून देते. तसं लातूर आपल्याला परिचित असतं, मुख्यमंत्र्याचं शहर म्हणून. लातूर पॅटर्न विकसित करणारं गाव म्हणून. मराठवाड्यातली एक महत्वाची बाजारपेठ म्हणून आणि भूकंपाचा भीषण धक्का …
कन्नूरला हिंसाचाराचा शापही राजकीयच ?
केरळ म्हणजे देवभूमी. केरळ सरकार असो की तिथली जनता, केरळला गॉड्स ओन कंट्री असं मोठ्या अभिमानाने मिरवून घेतात. पण या देवभूमीत उत्तरेकडे एक भाग असाही आहे की देवभूमीचेच लोक त्याचा उल्लेख नरक असा करतात. हा भाग आहे कन्नूरचा. कन्नूर हा केरळमधला एक जिल्हा. लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं तर राज्यातल्या तिसऱ्या क्रमांकाचं शहर. म्हणजे कोची, तिरूवनंतपुरम् आणि …