बार्शी


बार्शी… तसं लौकिकअर्थाने कधीच गिरणगाव नव्हतं… जयशंकर मिल म्हणजेच बार्शी टेक्स्टाईल मिलचा भोंगा (सायरन) अजूनही वाजतो आणि बार्शीची ती एक खास ओळख आहे… बार्शी गिरणगाव नसलं तरीही…

बार्शीत पहिल्यांदा आलो ते 1987 साली… येरमाळ्याहून आलो होतो, अण्णांसोबत… बार्शीला घर हलवायचा निर्णय झाला होता, तेव्हा… सर्वात आधी मला शाळेत घालावं लागणार होतं. जामगाव रस्त्यावर म्हणजे येरमाळ्याकडून येणाऱ्या मार्गावर असलेलं बार्शीतलं एक मोठं शैक्षणिक संकुल… (किंवा कॅम्पस म्हणा हवं तर… म्हणतात ते पुढे पुण्यात आल्यावर कळलं) एसटीतून वडिलांसोबत खाली उतरल्यावर समोरच शाळेची मोठी कमान होती. माझ्य़ासाठी शाळेचीच कारण त्या अवाढव्य कमानीवर एका महाविद्यालयाचं नाव कोरलेलं असल्याचं बरंच नंतर वाचता आलं… मग थोडं चालत आल्यावर बार्शी टेक्निकल हायसकूल लागलं. भला मोठा परिसर… यापूर्वी शाळेचा एवढा मोठा परिसर कधी पाहिलाच नव्हता…

शाळेत जाण्यापूर्वीच सकाळी अकराचा सुमार असावा, एकाएकी खूप जवळून मोठ्ठा आवाज करत एखादं विमान जावा, किंवा कुणीतरी शत्रूराष्ट्राने आक्रमण करावा असा, कर्णकर्णश आवाज झाला, धडकी भरणारा आवाज… प्रचंड घाबरलो… काहीच सुचत नव्हतं. पण त्याचवेळी शाळेच्या मैदानात अनेक माझ्यापेक्षाही लहान मुलं खेळंत होती, जसं काही झालंच नाही की त्यांना काही ऐकायलाच आलं नाही… हळूहळू तो कर्णकर्कश आवाज कमी कमी होत गेला. शांत झाला, मी अण्णांना विचारल्यावर त्य़ांनी सांगितलं की तो मिलचा भोंगाल होता.. तिथल्या मुलांना बहुतेक ते सवयीचंच असावं. त्यामुळेच मला जशी धडकी भरली तसं घाबरणं त्यांच्या गावीही नव्हतं…

बार्शीत पाऊल ठेवल्या ठेवल्या तिथल्या मिलच्या भोंग्यानं मला सलामी दिली… अजूनही भोंगा ऐकला की त्या दिवसाची आठवण होते. पण घाबरायला होत नाही… कारण दररोज सकाळी साडेसहा आणि सात, दुपारी अकरा वाजता, त्यानंतर तीन आणि साडेतीन, नंतर रात्री साडेसात आणि आठ वाजणारा भोगा गेल्या 23 वर्षात चांगलाच कानवळणी पडलाय. म्हणूनच बार्शी लौकिकार्थाने गिरणगाव नसलं तरी दररोज वाजमारा भोंगा ही बार्शीची एक ठळक ओळख आहे…

पण बार्शीत कोणेएकेकाळी मंजे आताच्या भाषेत वन्स अपॉन ए टाईम तीन तीन सुतगिरण्या होत्या… एक राजन मिल, दुसरी लोकमान्य मिल आणि तिसरी जयशंकर मिल… राजन मिलच्या मालकाने म्हणे त्यावेळची अभिनेत्री मुमताजशी लग्न केलं होतं, खरं खोटं त्यांनाच माहिती… तर लोकमान्य मिल लोकमान्य टिळकांनीच स्थापन केल्याचं सांगतात… आता ती मिल जागेसह विश्वनाथ कराडांनी विकत घेतल्याची चर्चा बार्शीकर करतात. तिसरी मिल जयशंकर… आता त्याचं नाव बार्शी टेक्स्टाईल मिल म्हणजेच बीटीएम… एनटीसीच्या ताब्यात आहे. आणि या तीन गिरण्यातली ही एकमेव गिरणी सध्या सुरू आहे…

दरवर्षी 30 जानेवारीला सकाळी दहा-अकराच्या सुमारास दोनेक मिनिटांच्या अंतराने भोंगा वाजतो. महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी… ज्या जुन्या लोकांना हे माहितीय, ते अजूनही या वेळेत, त्या दिवशी दोन मिनिटे जिथे असेल तिथे शांतपणे उभं राहून मौन पाळतात…

बार्शीतून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नसला तरी वन्स अपॉन अ टाईम इथे तीन तीन मिल्स होत्या… हा एक रेल्वेमार्ग होता, रेल्वेच्या इतिहासात तो बार्शी लाईट या नावाने प्रसिद्ध आहे… नॅरोगेज रेल्वे मार्ग आहे, बार्शी हे लातूर-येडशी-बार्शी-कुर्डूवाडी-पंढरपूर-मिरज या मार्गावरचं महत्वाचं गाव… आणि बाजारपेठ… आणि देवस्थानही…

बार्शीत भगवंताचं खूप जुनं देवस्थान आहे.. या देवस्थानाच्या चारही बाजूने दरवाजे आहेत. पुराणात अंबरिष राजा इथे राज्य करत असल्याचे उल्लेख सापडतात म्हणे… शाळेत असतानाच कधीतरी ऐकलं होतं,
दहा खंड पृथ्वी, अकरा खंड काशी, बार्शीत नांदतो अंबऋषी…
आईने कुठल्यातरी पोथीत निघालेली, अंबरिषी राजाची गोष्ट सांगितली होती, पण आता तपशीलाने आठवत नाही…

बार्शीचा पुराणातला आणखी एक उल्लेख म्हणजे भगवान विष्णुची श्री भंगवंत या अवतारातलं मंदिर फक्त बार्शीतच आहे, अन्यत्र कुठेही नाही… आणि म्हणूनच पंढरपूरला जाऊन केलेला एकादशीचा उपवास बार्शीत येऊनच सोडावा लागतो, असं मानलं जातं, म्हणूनच अनेक भविक पंढरपूर वारीनंतर बार्शीत येऊन द्वादशी सोडतात… खरं-खोटं त्यांनाच माहित…

बार्शीविषयी लिहायचं… म्हणून इंटरेनटवर बराच शोध घेतला, तेव्हा विकीपीडिया मराठीमध्ये खूपच त्रोटक माहिती सापडली… इंग्रजी विकीपीडियामध्ये जरा जास्त माहिती सापडली… ती माझ्या ब्लॉगमध्ये पोस्ट केली तरी तेवढ्याने समाधान होत नव्हतं… कारण या कोरड्या माहितीच्या पलिकडेही बार्शी अजून बरंच काही आहे, असं वाटलं कारण मला त्यामुळेच बार्शी मनापासून भावलीय. अजूनही माझं गाव बार्शीपासून येरमाळ्याच्या दिशेनं तेरा किलोमीटर अंतरावर (दगड धानोरे) असताना कोणीही विचारलं की सोलापूर असं जिल्ह्याचं गाव न सांगता, थेट बार्शीच असं हट्टाने सांगतो. बार्शी कुठे असं विचारल्यानंतरच मी सोलापूर जिल्हा असा उल्लेख तपशीलात सांगतो.

बार्शी… म्हणजे मराठवाड्याचं प्रवेशव्दार, मराठवाड्याचा नकाशा पाहिला की तुम्हाला बार्शीचं स्थान निश्चित करायला वेळ लागत नाही. उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर आहे बार्शी… उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन वेगवेगळ्या तालुक्यांतून म्हणजे तुळजापूरहून परांड्याला जायचं असो किंवा कळंबहून परांड्यांला जायचं असलं की तुम्हाला बार्शीतून रस्ता असतो.

बार्शी म्हणजे भंगवंताचं मंदिर, बार्शी लाईट रेल्वे, आता गावाच्या प्रचंड बाहेर गेलेलं ब्रॉडगेज रेल्वे स्टेशन, तीन तीन सुतगिरण्या, दोन बंद पडल्या तरी त्यातल्या बीटीएमचा दररोज वाजणारा भोंगा… शिवाजीनगर आणि सुभाषनगर, कर्मवीरनगर, परांडा रोड, मुंबईनंतरचं थेट बार्शीत असलेलं सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी कॉलेज आणि शिवाजी क़ॉलेज, सुलाखे हायस्कूल, लिंगायत विरूद्ध मराठा… दाणेगल्ली, चाटी गल्ली… पांडे चौक… ज्याचं नाव या बार्शीतल्या प्रमुख चौकाला दिलं गेलंय, ते पांडे कोण याचा उलगडा अनेक वर्षे होतच नव्हता, पण कधीतरी त्यांचा फोटो पांडेचौकात चागला, ते कोण, त्याचं काम काय अजूनही मला माहिती नाही… पण पांडेचौक आहे, बार्शीतले खांडवीकर्स, महाद्वार चौक, भव्य शॉपिंग सेंटर… कोठारी बिल्डिंग असं बरंच काही म्हणजे बार्शी आहे… या यादीत आणखी बरीच भर टाकता येईल, तेव्हा कुठे बार्शीची ओळख पूर्ण होईल…

बार्शी
(विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून)

बार्शी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

बार्शी सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे.

धार्मिक महत्व – भगवंत मंदिर
बार्शी हे भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवंत मंदिर हे विष्णुचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे भारतातील एकमेव विष्णु भगवान मंदिर आहे. इ.स. १२४५ साली हेमाडपंथी शैलीने हे मंदिर बांधण्यात आले. या मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्यद्वार पूर्वमुखी आहे. गाभाऱ्यात गरुड़खांब आहे. चैत्र, मार्गशीष, आषाढी आणि कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात.

एकादशीला पंढरपुरात विठोबाचे दर्शन घेणारा वारकरी द्वादशीला बार्शीच्या भगवंताचे दर्शन घेतल्याशिवाय आपल्या गावी परत जात नाही.

आषाढी आणि कार्तिकी एकादशीस गरुडस्वार भगवंताची मिरवणूक शहरातून काढली जाते. प्रत्येक पौर्णिमेस छबीना बाहेर नेण्यात येतो.

राजकीय – विधानसभा निवडणूक

बार्शी विधानसभा मतदारसंघ

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९

उमेदवार पक्ष मते
दिलीप गंगाधर सोपल अपक्ष ९०,५२३
राजेंद्र विठ्ठल राउत काँग्रेस ८०,३१४
विश्वास अर्जुनराव बारबोले शिवसेना १८,०५१
अजित भास्कर कांबळे बसपा १,९५५
रवींद्र साहेबराव पाटील भाबम १,४०७
कमिलोद्दीन अजिमोद्दील काझी अपक्ष १,१४१
बाबासाहेब भाउराव वाडवे अपक्ष १,११९
राजेंद्र बाबुलाल सरनोत अपक्ष १,०७८
अमोल दत्तू गरड अपक्ष ६०५
——————
(विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून)
Barshi (Marathi: बार्शी) is a town and a Municipal Council in Solapur district in the state of Maharashtra, India.

It produces quality toor dal (lentil) and other agriculture products produced here. The town is traditionally considered as a gateway to the neighboring region “Marathwada”.

Barshi has one of two temples dedicated to Vishnu as Lord Bhagvant; the other is at Varanasi.

Barshi has also twelve Jyotirlinga such as Uttareshwar, Bhogeshwari, Baleshwar and so on. It is believed that lord Rama had traveled through here while going to Sri Lanka.

Barshi had three cotton textile mills, although only one survives. The three were Rajan Mill, Lokmanya Mill and Barshi Textile Mill (called BTM – Old Name JaiShankar Mills Ltd.). The last one is now managed by NTC- previously managed by Rao Bahadhur Ganpatrao Zadbuke alias Kakasaheb.

Barshi is also known for its wholesale trading market, called “Krishi Utapanna Bazar Samiti (adhat bazzar)”.

Farmer and cattle owners come to Barshi from all over to sell raw commodities, crops, vegetables, fruits, animals, and animal products to wholesale buyers, who then sell to big city traders.

It is emerging as a regional education centre with reputed educational institutes.

Nargis Dutt Memorial Cancer Hospital, initiated by film actor Sunil Dutt along with Utrayshwar Kathale, is situated in Barshi. It has state-of-the-art facilities and is funded privately (Bill & Melinda Gates Foundation) as well as by the government managed by the Sarumangle Utrayshwar Kathale Trust. The hospital is also linked to Tata Memorial Hospital for Cancer Research, Parel-Mumbai.

Dr. B.M Nene took the responsibility as the head of hospital since founded.

The great spiritual guru of Kundalini Shakti, the late Vamanrao Gulawani Maharaj, lived in Barsi for almost 12 years while he worked as a young school teacher in a local high school.

Educational Institutes

The city is well known in the region for its state of the art educational institutions and nearby districts and tehsils depends upon these educational facilities.
Major Pre Schools –
1 Shishuvihar Barshi.
Major Primary Schools –
1. Navin Marathi Vidyalaya Barshii
2. Nutan Marathi Vidyalaya Barshi
3. Jijamata Primary School Barshi
4. Mahatma Phule Primary School Barshi
5. MIT’s Smt. Prayag Karad Vishwashanti English Medium Primary School,Barshi

Major High Schools –
1 Sulakhe High School Barshi
2 Barshi Technical High School, Barshi (मी याच शाळेत शिकलो… सातवीपासून दहावीपर्यंत)
3 New Highschool Barshi
4 Maharashtra Vidyalaya, Barshi
5 Silver Jubilee High School, Barshi

Junior and Senior Colleges –
1 Shree Shivaji Mahavidyalaya
(Shri Shivaji Sikshan Prasarak Manadal – founded by Karmaveer Mamasaheb Jagdale) (याच कॉलेजमधून मी अकरावी शास्त्र – नापास आणि बारावी कला उत्तीर्ण झालोय)
2 Shriman Bhausaheb Zadbuke College,
3 B.P. Sulakhe Commerce College (या कॉलेजमधून मी अकरावी कला उत्तीर्ण झालोय)

Transport

Barshi was the original terminus of the 2 ft 6 in (762 mm) gauge Barsi Light Railway, constructed by British engineer Everard Calthrop.
The Barsi Light Railway opened in 1897, and was extended on a number of occasions until it reached a total length of 202 miles (337 km) in 1927.

The example of the Barsi Light Railway is regarded as having revolutionised the narrow gauge railway system of Indian subcontinent. The railway continued to operate as a narrow gauge railway until conversion to broad gauge began in the late 1990s as part of Indian Railways conversion program for all metre and narrow gauge lines.

The conversion of the narrow gauge track of the Barshi Light Railway to broad gauge was partly completed in 2007. The converted track from Latur to Osmanabad opened in September 2007. The converted track from Osmanabad to Kurduvadi is alson now operational from 19 October 2008. To start with Indian railways has started Mumbai-Latur railway. Subsequently some more trains will get added to the route.

This route will connect Barshi to Parbhani, Solapur, Pune and Mumbai, and to the national rail grid.

Barshi town is connected to Ahmednagar, Beed, Osmanabad and Latur towns by road. Osamanbad – Barshi – Kurduvadi new railway line are opened in Sunday 19 oct 2008

First Railway up 1006 Latur-Mumbai Mail express & down 1005 Mumbai Latur Barsi Town Mumbai express arrivel timing is 11.38 PM & departure 11.40 PM . Barsi Town Latur express arrivel timing is 4.38 AM depart timing 4.40 AM

————–

Barshi has PVC pipe manufacturing industries. it has about more than 30+ pvc pipe manufacturing units in barshi more than any other city across maharashtra. The first pipe unit was installed by Mr. Kirit Nathvani and Mr V Malshe from Mumbai in the year 1984.All the other currently present 30+ pipe units till date were also installed by Mr V Malshe as he is one of the most leading manufacture of extrusion PVC plants(extruder)Pipe manufacturing unit.
—————
STD Code of Barshi town is 02184 POSTAL PIN CODE IS 413 401 AND FOR KARMVEERNAGAR, BARSHI IS 413 411

Join the Conversation

6 Comments

 1. sunder lekha……Megrrajsir solapurkar naveee barshikar…. tats true…..:)

 2. Res sir,
  atishay chhan barshichi olakh mandliy aapan…
  barshichya jya mill chya bhongyacha aawaj aiekun aapan pratham ghaabarlat
  tya milchya management cha ek ghatak banun aaj me kaam karto aahe…
  tasech me patrakaritetil M.A. mass comm. course compleate kela aahe Tyamule
  aapli story about barshi past and present khupach jawalaachi watali……

  Dhanyawad……. well come to barshi….

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: