काट्या-चमच्याने पुरणपोळी का खायची…!!!
इंटरनेटवर मराठी लिहिणं आता खूप सोपं झालंय. मायक्रोसॉफ्टची window XP ही ऑपरेटिंग सिस्टिम तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असेल तर मराठीतून आलेले ईमेल तुम्हाला सहज वाचता येतात. तसचं त्याचं उत्तरही मराठीतून देता येतं. कॉम्प्युटरवर मराठी लिहायचं कसं ते माहिती नसल्यामुळे आपण रोमन लिपीमध्ये फोनेटिक्स मराठी लिहिण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. हा प्रयत्न म्हणजे काट्या-चमच्याने पुरणपोळी खाण्यासारखं….
बहुतेक सर्व पीसींवर (ज्यामध्ये मायक्रोसॉफ्ट विंडो एक्सपी किंवा त्यापुढील व्हर्जन म्हणजे विस्टा, सेव्हन ऑपरेटिंग सिस्टिम आहे) मराठी फॉन्ट लोड केलेले असतात. ते नसतील तर फॉन्ट लोड करण्याचा सोपा उपाय असा
तुमच्या सिस्टिमच्या कंट्रोल पॅनलमध्ये (स्टार्ट मेनूमधून) जा,
तिथे रिजनल अँड लँग्वेज ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट करून ओपन करा
त्यामध्ये तुम्हाला रिजनल अँड लँग्वेज ऑप्शनची एक छोटी विंडो येईल. त्यामध्ये रिजनल ऑप्शन्स आणि लँग्वेजेस असे दोन वेगवेगळे भाग आहेत. त्यातल्या रिजनल लँग्वेजमध्ये अनेक वेगवेगळ्या भाषा आहेत. म्हणजे जगातल्या बहुतेक सर्व भाषा आहेत. त्यामध्ये मराठी सिलेक्ट करा आणि अप्लाय क्लिक करा
आता तुमच्या कॉम्प्युटरची भाषा बदललीय. तुम्ही मराठीतून टाईप करू शकता. त्यासाठी कीबोर्ड इनस्क्रीप्ट म्हणजे इंडियन स्क्रिप्टचा जगभरात वापरला जाणारा युनिकोडवर आधारित असा कीबोर्ड आहे, म्हणजे तुम्ही कोणत्याही ऍप्लिकेशनमध्ये असला तरी (एमएस वर्ड, ओपन ऑफिस, नोटपॅड इ.) मराठीतून टाईप करू शकता. कॉम्प्युटरची भाषा बदलण्यासाठी शॉर्टकट की आहे, Shift + Alt किंवा तुमच्या टास्कबारवर एका कोपऱ्यात कोणती भाषा सध्या सुरू आहे, याची छोटी अक्षरं मिळतात. म्हणजे मराठी असेल MA किंवा इंग्रजी असेल EN किंवा हिंदी असेल तर HI. या अक्षरांवर क्लिक करूनही तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता.
आधीच्या पद्धतीने म्हणजे रिजनल ऑप्शनमधून कॉम्प्युटरची भाषा बदलली नाही तर तुम्हाला त्याच विन्डोमधल्या लँग्वेजेसवर क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला सप्लिमेंटल लँग्वेज सपोर्ट (supplemental language support) तिथे तुम्हाला most languages are installed by default, to install additional languages, Select the appropriate check box below असा मेसेज दिसेल. त्या चेकबॉक्समध्ये install files for complex script and right to left languages [including THAI] आणि install files for East Asian Languages असे दोन चेक बॉक्स दिसतील. त्या दोन्ही चेकबॉक्सला क्लिक करा, त्यावेळी कदाचित कॉम्प्युटर तुम्हाला तुमच्या ऑपरेटिंग सिस्टिमची सीडी (मायक्रोसॉफ्ट विंडो एक्सपी) मागेल, ती सीडी इनसर्ट करा, सर्व फॉन्ट मराठीसह (आधी लोड केलेली नसल्यास) लोड होतील. त्यानंतर मग रिजनल ऑप्शनमध्ये तुम्हाला मराठी सापडेल, त्याला सिलेक्ट करा आणि भाषा बदलण्यासाठी अप्लाय करा.
आता तुमच्या कॉम्प्युटरची भाषा बदललेली आहे. आणि तुमच्या सोईने मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी जशी हवी तशी ती तुम्ही बदलूही शकता.
मग करा टाईप मराठीतून, वाट कशाची बघता
………………………………………………………………………………….
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ऋ
क का कि की कु कू के कै को कौ कं कः
ख खा खि खी खु खू खे खै खो खौ खं खः
ग गा गि गी गु गू गे गै गो गौ गं गः
घ घा घि घी घु घू घे घै घो घौ घं घः
ङ
च चा चि ची चु चू चे चै चो चौ चं चः
छ छा छि छी छु छू छे छै छो छौ छं छः
ज जा जि जी जु जू जे जै जो जौ जं जः
झ झा झि झी झु झू झे झै झो झौ झं झः
ञ
ट टा टि टी टु टू टे टै टो टौ टं टः
ठ ठा ठि ठी ठु ठू ठे ठै ठो ठौ ठं ठः
ड डा डि डी डु डू डे डै डो ढौ ढं ढः
ढ ढा ढि ढी ढु ढू ढे ढै ढो ढौ ढं ढः
ण णा णि णी णु णू णे णै णो णौ णं णः
त ता ति ती तु तू ते तै तो तौ तं तः
थ था थि थी थु थू थे थै थो थौ थं थः
द दा दि दी दु दू दे दै दो दौ दं दः
ध धा धि धी धु धू धे धै धो धौ धं धः
न ना नि नी नु नू ने नै नो नौ नं नः
प पा पि पी पु पू पे पै पो पौ पं पः
फ फा फि फी फु फू फे फै फो फौ फं फः
ब बा बि बी बु बू बे बै बो बौ बं बः
भ भा भि भी भु भू भे भै भो भौ भं भः
म मा मि मी मु मू मे मै मो मौ मं मः
य या यि यी यु यू ये यै यो यौ यं यः
र रा रि री रु रू रे रै रो रौ रं रः
ल ला लि ली लु लू ले लै लो लौ लं लः
व वा वि वी वु वू वे वै वो वौ वं वः
श शा शि शी शु शू शे शै शो शौ शं शः
ष षा षि षी षु षू षे षै षो षौ षं षः
स सा सि सी सु सू से सै सो सौ सं सः
ह हा हि ही हु हू हे है हो हौ हं हः
ळ ळा ळि ळी ळु ळू ळे ळै ळो ळौ ळं ळः
क्ष क्षा क्षि क्षी क्षु क्षू क्षे क्षै क्षो क्षौ क्षं क्षः
ज्ञ ज्ञा ज्ञि ज्ञी ज्ञु ज्ञू ज्ञे ज्ञै ज्ञो ज्ञौ ज्ञं ज्ञः
This site is very usefull for those guys who looking for marathi fonts or marathi vowels. But now it is easier with help of this site. I was searched lots of world to getting marathi vowels or marathi barakhadi. but no one show the results for complete marathi barakhadi. thanks ……
Tanuja Bane, 1969tnj@gmail.com
नमस्कार,
इन्स्क्रिप्ट की बोर्डमध्ये “आदिती” टाईप करण्यासाठी Shift E for आ o+f for दि आणि l+R for ती… इन्स्क्रीप्ट की बोर्डजमध्ये डाव्या हाताला सर्व स्वर आहेत आणि उजव्या हाताला व्यंजने आहेत… Q W E R T या पहिल्या लाईनमधील कीमध्ये अनुक्रमे औ, ऐ, आ आणि ई आणि ऊ असे स्वर आहेत. या कीज दाबण्यापूर्वी शिफ्ट की दाबून ठेवलेली असेल तर पूर्ण स्वर येतो, म्हणजे मी टाईप केला तसा…. शिफ्ट की प्रेस केली नाही तर ौ, ै, ा, ी, ू अशी अक्षरे उमटतात… त्याखालील ओळीत A, S, D, F, G या कीज आहेत, त्यामध्ये ओ, ए, अ, इ, उ अशी अक्षरे आहेत… शिफ्ट प्रेस न करता ही अक्षरे ो, े, ्, ि, ु अशी उमटतील… त्याखाली म्हणजे तिसऱ्या ओळीत Z, X या की आहेत. त्या प्रेस केल्यावर येणारे स्वर म्हणजे अनुक्रमे ऎ ँ अशी आहेत. त्यापैकी ऎ आपण सहसा वापरत नाहीत… तर x मध्ये अनुस्वार आहे, शिफ्ट प्रेस करून x की दाबली की चंद्रबिंदी अनुस्वार उमटतो.. त्यानंतर x च्या शेजारीच असलेल्या C की मध्ये म आणि ण ही अक्षरे आहेत, शिफ्ट केल्यावर ण आणि इतरवेळी म… उजव्या बाजूला BACKSPACE च्या खाली \ या कीमध्ये ऑ किंवा ॉ हा स्वर आहे, त्यामुळे ऑफिस, कॉफी असे शब्द लिहिता येतात… त्याशेजारचा महिरपी कंस पूर्ण असलेल्या ] या कीमध्ये ञ हा स्वर आहे, त्याचाही हल्ली फारसा वापर होत नाही.. त्याच्या अलीकडे महिरपी कंसाची सुरूवात दर्शवणारी एक की आहे, [ त्यामध्ये ड किंवा ढ ही अक्षरे आहेत. प्रश्नचिन्हाच्या कीमध्ये य हे अक्षर आहे… त्याशिवाय वरील नंबर की मध्ये काही जोडाक्षरे आहेत, त्यामध्ये (2 ॅ) (3 ्र) (4 र्) (5 ज्ञ) (6 त्र) (7 क्ष) (8 श्र) ही मराठी जोडाक्षरे आहेत.
माझ्या ब्लॉगवर खूप दिवसांनी एक काहीतरी चांगली प्रतिक्रिया दिल्याबद्धल आभारी आहे. मी खरं तर कॉम्प्युटरचं कसलंही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाही.. की टाईप करण्याचा सिक्वेन्स मला माहिती आहे, फक्त मला कीबोर्ड पाठ आहे, त्यामुळे टाईप करता येतं…एवढंच… मी दिलेल्या माहितीमुळे आपल्याला मदत होईल, अशी अपेक्षा आहे… धन्यवाद
धन्यवाद… अमितजी…
wooowww…superb….. ! 🙂
धन्यवाद, विनायक
धन्यवाद