महायात्रा : वारी विधानसभेची II

महायात्रा : वारी विधानसभेची हा एबीपी माझाचा खास कार्यक्रम… 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आखण्यात आला होता. महाराष्ट्रातील सर्व सामान्य जननेचं प्रवासाचं साधन असलेल्या एसटी बसमधून सबंध महाराष्ट्र फिरायचा आणि जनतेच्या प्रश्नावर त्यांनी निवडून दिलेल्या किंवा निवडून देणार असलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करायची असा हा कार्यक्रम होता. या प्रकारच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला राज्यातल्या प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे संचलन करणाऱ्या कंडक्टर आणि बसचालकांची नावे घराघरात पोहोचली. तसंच निवडून आल्यानंतर सामान्य उमेदवारही कसा विदेशी बनावटी गाड्यांमधून फिरतो, आणि एसटीमध्ये बसणं हे लोकांच्या प्रतिनिधीला शान के खिलाफ वाटतं, त्याला लोकांच्या एसटीमध्ये बसलेलं पाहायलाही लोकांना आवडलं. त्यानंतर थेट पुढील म्हणजे 2014 च्या निवडणुकीलाच असा कार्यक्रम घेऊन येणं आम्हालाही जरा गैर वाटलं, थेट पाचवर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलो तर आम्ही आणि नेते यांच्यात फरक काय राहिला. म्हणूनच 2009 मध्ये एसटी मध्ये बसलेल्या नेत्यांनी तत्कालीन उमेदवारांनी दिलेल्या आश्वासनांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतला आणि 2012 मध्येच महायात्रा काढून विधानसभेवर वारी नेण्याचा निर्णय झाला. पंधरा दिवसात संबंध राज्यातून तब्बल चार हजार किलोमीटर्सचा प्रवास केला. आणि हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी तयार केला. कमी वेळ आणि जास्त अंतरामुळे काही जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व देणं शक्य झालं नाही. त्याबद्धल आमची दिलगिरी… 16 ऑगस्टपासून वारी विधानसभेची प्रसारीत होत आहे, 15 सप्टेंबरला त्याचा शेवटचा भाग प्रसारित झाला… महायात्रा : वारी विधान सर्व व्हिडिओ यूट्यूब प्लेलिस्टवर आहेतच त्याची लिंक

 • प्रोमो : वारी विधानसभेची
 • वाशी (नवी मुंबई) : वारी विधानसभेची
 • अलीबाग : वारी विधानसभेची
 • चिपळूण : वारी विधानसभेची
 • कोल्हापूर : वारी विधानसभेची
 • सांगली : वारी विधानसभेची
 • सातारा : वारी विधानसभेची
 • अकलूज-पंढरपूर (सोलापूर) : वारी विधानसभेची
 • सोलापूर : वारी विधानसभेची
 • बीड : वारी विधानसभेची
 • परभणी : वारी विधानसभेची
 • नांदेड : वारी विधानसभेची
 • यवतमाळ : वारी विधानसभेची
 • चंद्रपूर : वारी विधानसभेची
 • वर्धा : वारी विधानसभेची
 • नागपूर : वारी विधानसभेची
 • अमरावती : वारी विधानसभेची
 • खामगाव (बुलडाणा) : वारी विधानसभेची
 • जळगाव : वारी विधानसभेची
 • धुळे : वारी विधानसभेची
 • नाशिक : वारी विधानसभेची
 • पुणे : वारी विधानसभेची
 • पिंपरी-चिंचवड (पुणे) : वारी विधानसभेची
 • औरंगाबाद : वारी विधानसभेची
 • अहमदनगर : वारी विधानसभेची
 • ठाणे : वारी विधानसभेची
 • मुंबई : वारी विधानसभेची (पूर्वार्ध)
 • मुंबई : वारी विधानसभेची (उत्तरार्ध-अंतिम)

Wari Vidhan Sabhechi (A Political Sojourn Of Maharashtra with ST Bus) is a Special Travelogue Of Political Maharashtra. This show is about a Chat with Political leaders of Maharashtra in ST Bus which is regular mode of transport of Maharashtra. We asked all party leaders to board this Bus and discuss on people’s issue. In 2009 this show was a hit one on Assembly elections, Now After 3 years this was a review sort of earlier show- Season 2 WARI VIDHANSABHECHI

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: