व्हाय धिस कोलावेरी डी…..?

व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी? ऐकलंय तुम्ही हे गाणं… सध्या इंटरनेटवर प्रचंड गाजतंय… तसं हे गाणं थोडं तामिळ आहे आणि थोडं इंग्लिश… अगदी स्पष्टपणे सांगायचं तर तिग्लिंश… म्हणजे आपल्याकच्या मिंग्लिश किंवा हिंग्लिश सारखं… कोणत्याही भारतीय भाषेचं इंग्रजीबरोबर फ्यूजन केलं की अशी हायब्रीड भाषा जन्म घेते. आपली बंबईया हिंदीही अशीच मराठी, हिंदी आणि गुजरातीचं फ्यूजन आहे..

तर पुढील वर्षी येणाऱ्या 3 म्हणजेच मुंदरू…(THREE) किंवा थ्री किंवा तीन या सिनेमातील हे गाणं आहे. धनुष म्हणजे रजनीचा जावई या सिनेमाचा हिरो तर कमल हसनची पोरगी श्रुती हसन हिरोईन… रजनीची मुलगी ऐश्वर्या धनुष या सिनेमाची निर्माती आहे. हे गाणं रेकॉर्ड झाल्यावर ते कुणास ठाऊक कसं इंटरनेटवर लीक झालं, तशी अनेक गाणी इंटरनेटवर लीक होतात. तसं हेही झालं, आणि या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यामुळे या लोकप्रियतेचा फायदा उठविण्यासाठी या गाण्याचे हक्क असलेल्या सोनी म्युझिकने मग फक्त हे एकच गाणं इंटरनेटवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे अजूनही बाजारात या सिनेमाच्या म्युझिक सीडी किंवा अन्य काही लाँच झालेलं नाही. तुम्हाला हे गाणं फक्त इंटरनेटवरच ऐकता येऊ शकेल. हां…परवापासून एमटीव्हीवर दाखल झालंय…


आतापर्यंत तब्बल 55 लाखआपेक्षांही जास्त नेटीझन्सनी हे गाणं सोनीच्या ऑफिशियल पेजवर पाहिलंय, एकलंय… या गाण्याची कॉपी करून ते वेगवेगळ्या चॅनेलवर शेअर करणारांची संख्या तर अफाट आहे. तब्बल 55 लाखांपेक्षाही जास्त लोकांना वेड लावणारं किंवा गुणगुणायला लावणारं हे गाणं सध्या इंटरनेटवरील एक परवलीचा शब्द बनलंय. फक्त तामीळनाडूच नाही तर संबंध भारत वर्षात, सर्व प्रकारचे भाषेचे अडथळे ओलांडून या गाण्याने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडलेत.

चेन्नईच्या दी हिंदू या दैनिकाने आज कोलावेरी कोलावेरी डी या गाण्याची, त्याच्या लोकप्रियतेची बातमी पहिल्या पानावर छापलीय. ही बातमी सर्वांनी वाचावी अशी तर आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाच्या आहेत, त्या इंटरनेट एडिशनवर संबंधित बातमीवर व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया… तरूणांनी कोलावेरीची बातमी पहिल्या पानावर छापण्याचं स्वागत केलंय, तर काहीं सीनिअर सिटीझन्सनी ही बातमी पहिल्या पानावर देण्याचा निषेध केलाय. एकाच बातमीवर किती परस्पर टोकाच्या प्रतिक्रिया येऊ शकतात, हे याचं चांगलं उदाहरण.. एवढंच नाही तर तरूण आणि म्हातारे यांच्यातली दरी किती रूंदावते आहे, याचंही एक निदर्शक आहे… काहींनी म्हटलंय की ते पन्नास वर्षांपासून हिंदूचे वाचक आहेत, पण असा थिल्लरपणा त्यांनी यापूर्वी कधी अनुभवला नाही, तर काहींनी या गाण्याला विरोध असतानाही, केवळ हिंदूने पहिल्या पानावर कोलावेरीचा लेख छापलाय म्हणून ते एकलं आणि त्या गाण्याच्या प्रेमात पडले… सारच काही विलक्षण आहे…
या गाण्याचे शब्द बघा… म्हणजे ऐका, लक्षपूर्वक.. किंवा सहज ऐकलं तरी चालेल… गुणगुणावसं वाटेल… लगेच.

य्यो बॉईस आय एम सिंग अ साँग…
(सूप साँग..
फ्लॉप साँग..)

व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी

(रिदम करेक्ट….)

व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
(मेन्टेन धिस….)
व्हाय धिस कोलावेरी…. आss डी

डिस्टन्सुलो मून मून, मून कलरू व्हाईट्ट…

व्हाईट बॅकग्राऊंडा नाईट्ट नाईट्ट
नाईट्ट कल्लरा ब्लॅक्क…

व्हाय धिस कोलावेरी, कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी, कोलावेरी कोलावेरी डी

व्हाईट्ट स्कीन्न… गर्ल… गल…
गल… हार्ट्ट.. ब्लॅक्कअ…

आईस.. आईस यू… मीट्ट.. अ.. मीट्ट.. अ..
माय फ्यूचर डार्क्का… डार्क्का…

व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी

(मम्मा, नोट्स इदुथूको…
आपडिये काएला स्नॅक्स.. इदुथुको…)

पा… पा… पांन… पा… पा… पांन… पा… पा… पांन…
(सारीया वस्सी…)

(सुपर मामा रेडी…)
रेडी 1… 2… 3… 4…

(व्हाआ… वॉटआ… अ चेंज ओव्हर मम्म्मा…)
(ओ के, मम्म्मा, नाऊ ट्यून चेंज यू… )
काएला ग्लास
(ओन्ली इंग्लीश…)
हँड ला ग्लास…
ग्लास ला स्कॉच…
आईस यू फुल्ल्ल्लाआ… टीअराआ…
एम्टी लाईफ्फ्फा… गर्ल्ल .. कम्माआ …
लाईफ रिवर्स गियरा आ…
लव्वा, लव्वा… ओ माय लव्वा…
यू शोड मी बोव्वा…

कौअ कौअ… होली कौअ अ…
आय वॉन्ट यू.. हिअर नौवू अ…
गॉड, आय एम डाईंग नाऊ अ…
शी इज हॅपी, हौवू अ…

धिस साँग फॉर सूप्प बॉईस्सा …
वुई डोन्ट हॅव्व चॉईस्सा…अ..

व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी

अनिरूद्ध रविचंद्र या दक्षिणेतल्या संगीतकाराने हे गाणं संगीतबद्ध केलंय. तर गायलंय स्वतः धनुशनेच शिवाय या गाण्याचे बोलही त्याचेच आहेत. या गाण्याचे प्रोमो 19 नोव्हेंबर 2011 ला पहिल्यांदा यूट्यूबवर अधिकृतपणे अपलोड करण्यात आले. म्हणजे त्यापूर्वीच या गाण्याने बऱ्यापैकी लोकप्रियता मिळवली होती. ही लोकप्रियता कॅश करण्यासाठी अधिकृतपणे हे गाणं इंटरनेटवर रिलीज करण्यात आलंय.

या सिनेमाची दिग्दर्शक असलेल्या ऐश्वर्या धनुषला या सिनेमासाठी खास तरूणाईने गच्च भरलेलं, उडत्या चालीचं आणि हलकं फुलकं… सहज गुणगुणता येईलसं गाणं हवं होतं… तशी हिरोच्या प्रेमभंगाची सिच्युएशनही या गाण्याला आहे. या सगळ्याच्या फ्यूजनमधून या गाण्याची चाल आकाराला आली, तीही अवघ्या दहाच मिनिटात… असं कंपोजर अनिरूद्ध रविचंद्र सांगतो. त्यानंतर अवघ्या वीसच मिनिटातच या चालीवर तोडक्या मोडक्या इंग्लीशमध्ये आणि तमीळमध्ये म्हणजेच तिंग्लिशमध्ये धनुषने त्या चालीसाठी शब्द बसवले… झालं की गाणं तयार…

या गाण्याचा गायक आणि गीतकार… धनुष सांगतो, की तसं पाहिलं तर हे गाणं बाथरूमध्ये गुणगुणावं असं आहे, हलकं.. फुलकं.. हल्ली तसा प्रत्येकाचाच कधी कधी ना हार्ट ब्रेक झालेला असतो. त्यामुळे सर्वांनाच हे गाणँ रिलेट करेल, असं त्याला वाटलं… आणि गाणं चक्क सुपर डुपर हिट झालं… म्हणजे एका गंमतशीर आणि केवळ परिस्थितीजन्य गाण्याने एक विश्वविक्रम केलाय.

या गाण्यात असलेल्या तमीळ शब्दाचे काही तमीळ शब्दांचे अर्थ असे आहेत…

कोलावेरी : विश्वासघात, जीवघेणा
सूप साँग : प्रेमभंगाचं गीत
सूप बॉईज : प्रेमभंग झालेले तरूण
शो मी बोवू यू.. : प्रेमात नाकारलेला

हे गाणं अधिकृतपणे इंटरनेटवर रिलीज झाल्यानंतर म्हणजे 16 नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच म्हणजे 21 नोव्हेंबरला ट्विटरवर #kolaveri हा टॅग सर्वाधिक प्रसारित होणारा टॅग ठरला.

एवढंच नाही तर जागतिक संगिताच्या लोकप्रियतेच्या क्रमवारीत आता हे गाणं तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलंय आणि लेडी गागाच्या अल्बमला टक्कर देतंय….

आजवर भारतातल्या शेकडो वृत्तपत्रांनी या गाण्याचं विश्लेषण करणारे आणि त्याच्या लोकप्रियतेचं रहस्य उलगडणारे लेख लिहिलेत… पण गाणं ऐकणाऱ्यांना हे असलं काहीच वाचावसं न वाटताही थेट गाणंच ऐकावं वाटतं…

म्हणजे सध्याच्या भाषेवरून मारामारी होण्याच्या किंवा थेट मुडदे पडण्याच्या काळात एक तमीळ गाणं, भारतासारख्या खंडप्राय देशात राज्याराज्यांच्या सीमा ओलांडून लोकप्रिय होतंय… राजकीय विश्लेषक ज्याला राष्ट्रीय एकात्मता म्हणतात, ती यापेक्षा वेगळी असते का? म्हणूनच हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडतो…
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी…..?

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

5 Comments

  1. हे गाणं इंटरनेटवर लिक झालं की लिक करण्यात आलं याबद्दल संभ्रम आहे. एखादं गाणं फिल्म चालण्यासाठी कश्यापध्दतीनं फायदेशीर ठरतं हे ढिंकचिका ढिंकचिका या गाण्यानं दाखवून दिलंय. सलमान खानच्या या सिनेमात या गाण्या व्यतिरीक्त काहीही नव्हतं. जे लक्षात राहिल. असो, सध्या तरी कोलावेरी फिवर आहे. गाणं चांगलं झालंय यात शंका नाही. धनुष्य एक चांगला अभिनेता आहे. रजनीकांतनं पॉप्युलर म्हणजे जे फक्त जनसामान्यांना आवडतील असे सिनेमें केलेत. स्टाईलवर रजनीकांतनं जबरदस्त फैनफॉलाईंग तयार केला. पण धनुष्यचे सिनेमे वेगळे असतात. त्याला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला अडुकलम हा सिनेमा खरंच सुंदर आहे. त्यात त्याचा अभिनय चांगला झाला. मुळात तामीळनाडूतल्या छोट्या गावातली ही कथा वैश्विक आहे. त्याला कादल कोंडीयन हा सिनेमाही आपल्याला भारी आवडला. तो रजनीपेक्षा उजवा अभिनेता आहे, यात शंका नाही

  2. बंडू, तुझी प्रतिक्रिया खूप चांगली आहे, धनुषबाबतच्या तुझ्या मताशी मी सहमत आहे… फक्त गाणं इंटरनेट लिंक झालं की करण्यात आलं त्यामुळे काहीच फरक पडत नाही… सलमान आणि ढिंकचिका च्या बाबतीत तू जे म्हटलंय, ते खरंही असेल.. पण कोलावेरीच्या बाबतीत सांगायचं तर कितीही ठरवून प्रमोशन वगैरे केलं तरी गाणं ऐकायचं की नाही यासाठी कुणावर जबरदस्ती करता येत नाही. आताशा हे गाणं एमटीव्हीवर रूजू झालंय, MTV वर सादर होत असलेलं पहिलं तमिळ गाणं आहे… शिवाय काही रिमिक्स आणि इतर व्हर्जनही यूट्यूबवर दाखल झालेत. एमटीव्हीवर दाखल होण्यापूर्वीही तब्बल 40 लाख लोकांनी हे गाणं ऐकलं होतं… म्हणजेच गाणं स्वतःहून तुम्हाला ऐकायला भाग पाडतंय.. असं काहीतरी आहेच त्यामध्ये… साधेपणा आणि तरूणांना अपील करणारं असं काहीतरी विलक्षण…

  3. I LIKE THIS SONG VERY MUCH. Mala he song mazya10yrs sun gaat hota tenwha mala mahit padal.maz he song byhard zal.Dhanush &he’s wife also cute cupple.sadya tari aamchaya ghari hech abhang chalu aahe.kolalaveri ………………….nonstop.

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: