थप्पड की गूंज… उतावीळ अण्णा आणि सोशल नेटवर्किंग

One may have a problem with politico who’s allegedly corrupt/inefficient, slapping him doesn’t make things right.

आज सकाळी कुणाच्या काही ध्यानी मनी नसताना एक बातमी आली, शरद पवारांना थोबाडीत मारल्याची… दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास… दिल्लीतल्या एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना. कार्यक्रम इफकोचा होता. एनएमडीसी बिल्डिंगमध्ये हा कार्यक्रम होता. तिथे कुणातरी हरविंदर सिंह नावाच्या एका माथेफिरूने शरद पवारांच्या श्रीमुखात भडकवण्याचा प्रयत्न केला. त्याचा संताप अनावर होता. आपल्या संतापाला त्याने फिल्मी स्टाईलने वाट मोकळी करून दिली. खरं तर याच हरविंदरने पाचेक दिवसांपूर्वीच दूरसंचार घोटाळ्यात दोषी ठरलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांच्या कानशिलात लगावण्याचाही प्रयत्न केला होता. यामुळे तो माथेफिरू आहे, हे तर स्पष्टच आहे.

सुखराम हे भ्रष्टाचारप्रकरणी दोषी असल्याचं सिद्धही झालं होतं, एवढंच नाही तर न्यायालयाने त्यांना शिक्षाही सुनावली होती, तरीही हरविंदरला आपला संताप व्यक्त करावा वाटला. त्याचा दुसरा पराक्रम आज सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक चॅनेल्सच्या माध्यमातून देशाला पाहायला मिळाला.

हरविंदर कोण आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे, तो असं का करतो, तो पागल आहे की माथेफिरू हे सर्वच प्रश्न सध्यातरी गैरलागू आहेत. जरा फेसबुकवर फेरफटका मारा म्हणजे मग कळेल की लोकांचा संताप किती प्रचंड आहे. काय झालंय, हे कळायच्या आतच कितीतरी लोकांनी शरद पवारांच्या श्रीमुखात भडकावल्याच्या बातमीला शेकड्याने लाईक केलं. हा त्यांना झालेला मनस्वी आनंदच होता. कारण शरद पवार एक राजकारणी आहेत, लोकांना फक्त महागाईच्या झळा बसतात, त्यांना प्रत्यक्ष त्या सोसाव्या लागतात. त्यामुळे त्यांचा राग फेसुबकवरून व्यक्त होणं स्वाभाविकच आहे. लोकांचा राग हा कधीही सुसंस्कृतपणे बाहेर पडत नाही. झुंडीचं मानसशास्त्र असतंच असं विचित्र… फेसबुकवर आज असणाऱ्या झुंडीसाठी ही वाट एका हरविंदरने करून दिली. फेसबुकवर आलेल्या अनेक कॉमेन्टमध्ये त्याला भारतरत्न देण्याचीही शिफारस करण्यात आली. याचा अर्थ हरविंदरने केलेल्या भ्याड हल्ल्याचं समर्थन करायचं असा होऊच शकत नाही, तरीही लोकांच्या मनात खदखदत असलेला असंतोष कुठेतरी नोंदला जाणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की हरविंदरने शरद पवारांना मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर फेसबुक किंवा एकूणच सोशल नेटवर्किंगवर जे काही व्यक्त झालं, ते खऱ्या अर्थाने लोकमत होतं, सर्वसामान्य जनमानसाची भावना होती, म्हणजेच लोकभावना होती.

लोकांना चांगलं वाईट कळत नाही, जो एक पुढे गेला, त्याच्या वाटेवर जाऊन ते त्याला पायवाट करून रूळवून टाकतात. हे अगदी अनादीकालापासून चालत आलंय. आजचा काळ लोकशाहीधिष्टीत तंत्रज्ञानाचा असला तरी त्याला अपवाद नक्कीच ठरणार नाही. कारण लोकांना अभिव्यक्त होण्यासाठी हीच लोकशाहीधिष्टीत माध्यमे आहेत. सोशल नेटवर्किंग त्याचं नाव.

शरद पवारांवर हरविंदर नावाच्या कोणातरी तरूणाकडून हल्ला झाल्यानंतर त्याचे महाराष्ट्रात जे काही पडसाद उमटले, त्याचाही समाचार घेतला गेला पाहिजे. खरं तर हे सर्वच पडसाद हे नियोजनबद्ध असल्याचं स्पष्ट दिसतं, यासाठी जाणीवपूर्वक कसलंही शोध कार्य वगैरे करण्याची गरज नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे सर्व जाणीवपूर्वक घडवून आणलं. दस्तुरखुद्द साहेबांनीच त्यापूर्वीच स्टार माझाला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर हल्ला झाल्या झाल्या मीडियासमोर सर्वात पहिली अधिकृत प्रतिक्रिया आली ती शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांची.. त्या आज दिल्लीतच होत्या. त्यांनी आधी शरद पवारांची भेट घेतली आणि मीडियाला सांगितलं की शरद पवार सुखरूप आहेत आणि त्यांना कसलीही इजा झालेली नाही, त्यांना कुणालाही दोष द्यायचा नाहीय, कुणालाही या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवायचं नाही… म्हणूनच कार्यकर्त्यांनी अतिशय शांततेनं या घटनेचा निषेध करावा, पण त्याचं वक्तव्य माध्यमांमधून प्रसारित होण्यापूर्वीच दगडफेक आणि रास्ता रोको किंवा बंद असल्या प्रकारांना सुरूवात झाली होती.

साहेबांच्या फोन मुलाखतीचा काही परिणाम झाला की त्यांच्या कन्येच्या… त्यानंतर महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांनीही शांततेत निषेध करण्याचं आवाहन केलं. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हवा तोच अर्थ घेतला या आवाहनाचा…

खरं तर हे सगळं म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं लोकांना वेठीस धरणारं निषेध आंदोलन सुनियोजित असल्याशिवाय शक्यच होत नाही. कारण राज्याच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे म्हणून राष्ट्रवादीचं काहीतरी आस्तित्व आहे, त्या सर्व ठिकाणी रास्ता रोको किंवा बंद पाळण्यात आले. आपापल्या परीने निषेध नोंदवण्यात आला. आणि पुन्हा कार्यकर्त्यांच्या या कर्तृत्वाचे फोटोही फेसबुकवरच अपलोड करण्यात आले. कारण फेसबुकच्या माध्यमातूनच राजकारण्यांविषयीचा असंतोष पसरायला सुरूवात झाली. अगदी नियोजनबद्ध रितीने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राज्यभरात केलेल्या निषेध आंदोलनाला जमेल तसं फेसबुकवर प्रेझेन्स दिला. कारण बातमी आल्यानंतरचा अर्धा दिवस हा फेसबुकर्सनी जल्लोष साजरा करण्यातच घालवला होता.

अण्णांचा उतावीळपणा…

अण्णा हजारे यांच्याकडे राजकीय शहाणपण किंवा समज किंवा जाण म्हणा हवं तर… याचा पूर्णपणे अभाव असल्याचं आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं. राळेगणसिद्धीत जमलेल्या पत्रकारांनी जेव्हा अण्णांना या सर्व प्रकाराबद्धल माहिती सांगून अण्णांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर अण्णांनी आपल्या अपरिपक्वतेचं दर्शन देत एकच थप्पड मारली असा प्रतिप्रश्न केला. खरं तर फेसबुकवरून या पोस्टलाही मोठा प्रतिसाद मिळाला. अनेकांनी अण्णांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. तर काहींनी अण्णांची सटकली असल्याची शक्यता व्यक्त केली. दुसऱ्या बाजूला अण्णांचा निषेध करणाऱ्यांची संख्याही मोठी होती. म्हणजे आज एकुणातच फेसबुकवर वेगवेगळ्या पक्षाला, विचारांना, व्यक्तींना मानणाऱ्या लोकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. नंतर अण्णांनी स्टार न्यूजबरोबर बोलताना सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तरी त्यामुळे अण्णांच्या राजकीय अपरिपक्वता जास्तच उघड झाली. याच अण्णांनी जेव्हा रामलीला मैदानावर बारा दिवस उपोषण केलं तेव्हा याच फेसबुकर्सनी आपापल्या कुवतीप्रमाणे अण्णांना जाहीर पाठिंबा दिला होता. आज अहमदनगरमध्ये त्यांचा पुतळा जाळायलाही हीच तरूणाई म्हणा किंवा पेड कार्यकर्ते पुढे आली. लोकांना आपलं मत बदलायला वेळ लागत नाही.

ट्वीटरवरून शरद पवारांच्या हल्ल्यावरील निषेध हा तसा सोफिस्टीकेटेड होता.. म्हणजे फेसबुकच्या तुलनेत तरी… गर्दीला किंवा हरविंदरसारख्या माथेफिरूला एवढा विचार करायला किंवा सारासार विवेक समजून घ्यायला वेळच नसतो, किंवा विचार करावा एवढी कुवतच नसते. माझ्या ब्लॉगच्या सुरवातीला टाकलेली ओळ मला आलेला एक ट्वीटच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा ट्वीट थेट पाकिस्तानातून आलेला आहे, रिझवूल हसन लश्कर (@Rezhasan) असं हा ट्वीट करणाऱ्या पत्रकाराचं नाव आहे, तो पीटीआयचा इस्लामाबाद प्रतिनिधी आहे.

शरद पवारांविषयीचा म्हणा किंवा एकूणच राजकारण्यांविषयीचा लोकांच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषाला आज वाट मिळाली, कधी ती फेसबुकच्या माध्यमातून मिळते तर कधी ती हरविंदर सारख्या माथेफिरूपणातून मिळते.. पण ही वाट किंवा ही अभिव्यक्ती मतपेटीतून व्यक्त व्हायला हवी, पण ती अभावानेच होते….

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

4 Comments

  1. ” तिथे कुणातरी हरविंदर सिंह नावाच्या एका माथेफिरूने शरद पवारांच्या श्रीमुखात भडकवण्याचा प्रयत्न केला.”
    हे आपला वाक्य. आपण त्याला माथेफेरू कशावरून ठरलात. तो माठेफेरुच असता तर त्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या कुणाच्याही तोंडात मारली असती न. त्यासाठी शरद पवार किंवा सुखरामच कशाला हवे होते. नथुराम गोडसेलाही अनेक लोक माथेफेरुच म्हणतात. पण मग त्यांनीही गांधीजींनाच का गोळ्या घातल्या.

  2. विजय जी, काहीही झालं तरी त्या थप्पड मारण्याचं समर्थन होऊ शकत नाही, म्हणून तो माथेफिरूपणाच आहे… मला महत्वाचं वाटतं ते त्यानंतर लोकांचा झालेला उद्रेक, विशेषतः सोशल नेटवर्किंगवर झालेला जास्त महत्वाचा वाटतो… तुमचा दुसरा मुद्दा आहे की जर तो माथेफिरू असता तर त्याने कुणालाही येता-जाता थप्पड मारली असती, तर त्याला आपल्याकडे माथेफिरूपणा नाही तर वेडेपणा किंवा मानसिक रूग्ण असं म्हणतात. तो माथेफिरू आहे कारण त्याची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे… म्हणजे महागाईला फक्त एकटे शरद पवार जबाबदार नसतात, एकटे शरद पवार भाषणबाजी करत नाहीत, शिवाय आपण आपल्या डोक्यावर बसवलेले नेते आपण निवडून देतो म्हणूनच आपल्यावर राज्य करतात, ते काही आकाशातून येत नाहीत… ते आपल्यामधूनच तयार होतात. मतदानअस्त्राचा योग्य वापर केला तर अशा थापडा मारण्याची वेळ येणारच नाही. गोडसेही माथेफिरूच होता, कारण तो काय करतोय, हे त्याला ठाऊक होतं.. त्याच्या कृतीचा तर जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. विचारांचा सामना विचारांनी करावा लागतो. गोडसेनं गांधीजींची हत्या केली ती काही तात्कालीक कारणातून नव्हे… नरहर कुरूंदकराचं “शिवरात्र” हे पुस्तक मिळालं तर नक्की वाचा… त्यात त्यांनी गोडसेंच्या दोन्ही दाव्यांचा म्हणजे 55 कोटी आणि फाळणीचा व्यवस्थित समाचार घेतलाय. एवढंच नाही तर गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 30 जानेवारी 1948 पूर्वी सातवेळा गांधींजींच्या हत्येचा प्रयत्न केला होता. साताऱ्याजवळ गांधीजींच्या सभेवर गोडसेनेच बॉम्बहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

  3. agadi khary matdanachya vedes netyan kadun midnyara khottya aashvasanala badi padnyachi ved bhartiyan var varav var yete…………..matdanchya vedes sagad visrayach nantar asach honar……..nehmi jantela bhulthapa marnarya rajkarnyani aata gabhirta odkhavi nahi tar ya peksa kiti tari bhayankar fade bhogavi lagel,,,,,,,,,,,,,,

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: