संदीप रामदासींचा ब्लॉग (sandeepramdasi.com)

एफडीआयची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. सरकारने रिटेल म्हणजेच किरकोळ दुकानदारीचं क्षेत्र थेट परकीय गुंतवणुकीसाठी खुलं केलंय, तसं हे क्षेत्रं आधीही खुलं होतंच. पण त्यावर मर्यादा होती. सिंगल ब्रँडसाठी आधी ही मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत होती, म्हणजे नोकियासारख्यांना भारतात त्यांची उत्पादने विक्रीसाठी ठेवायची तर त्यासाठी भारतीय उत्पादक शोधावा लागे, आता त्यांची मर्यादा 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलीय. […]

Rate this:

व्हाय धिस कोलावेरी डी…..?

व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी? ऐकलंय तुम्ही हे गाणं… सध्या इंटरनेटवर प्रचंड गाजतंय… तसं हे गाणं थोडं तामिळ आहे आणि थोडं इंग्लिश… अगदी स्पष्टपणे सांगायचं तर तिग्लिंश… म्हणजे आपल्याकच्या मिंग्लिश किंवा हिंग्लिश सारखं… कोणत्याही भारतीय भाषेचं इंग्रजीबरोबर फ्यूजन केलं की अशी हायब्रीड भाषा जन्म घेते. आपली बंबईया हिंदीही अशीच मराठी, हिंदी आणि गुजरातीचं फ्यूजन […]

Rate this:

तुम्हारा आंदोलन, आंदोलन… और हमारा नौंटकी…!

अण्णांच्या कालच्या उतावळेपणाचे पडसाद आजही उमटत आहेत. आज राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये ठाण मांडलंय. त्यांना म्हणे अण्णांच्या वक्तव्याचा निषेध करायचा आहे. मात्र त्यांना आपलं निषेध आणि आत्मक्लेष आंदोलन करू देण्यासाठी अण्णांचे कार्यकर्ते राजी नाहीत. आणि यामुळेच की काय आज राळेगणसिद्धीमध्ये तणाव आहे.

Rate this:

थप्पड की गूंज… उतावीळ अण्णा आणि सोशल नेटवर्किंग

One may have a problem with politico who’s allegedly corrupt/inefficient, slapping him doesn’t make things right. आज सकाळी कुणाच्या काही ध्यानी मनी नसताना एक बातमी आली, शरद पवारांना थोबाडीत मारल्याची… दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास… दिल्लीतल्या एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना. कार्यक्रम इफकोचा होता. एनएमडीसी बिल्डिंगमध्ये हा कार्यक्रम होता. तिथे कुणातरी हरविंदर सिंह नावाच्या […]

Rate this:

सोशल नेटवर्किंग : भान जबाबदारीचं

फेसबुक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तसं ते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतंच. फेसबुक म्हणजे सोशल नेटवर्किंग हे तर आता सगळ्या भारत वर्षाला ठाऊक आहे. जगभरात 80 कोटीपेक्षाही जास्त जण फेसबुकवर आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतेच आहे. लवकरच म्हणा किंवा येत्या काही वर्षात भारताच्या लोकसंख्येएवढी फेसबुक प्रोफाईल्सची संख्या असेल. (कृषिवल, मंगळवार, दिनांक 22/12/2011)

Rate this:

अंबेजोगाईच्या नेटीझन्सचे विधायक पाऊल

अंबेजोगाईची एक बातमी आहे, तुम्ही जर फेसबुकवर असाल तर तुम्हाला माहितीच असेल, कदाचित. एव्हाना काही वृत्तपत्रांमध्येही येऊन गेली असेल. बातमी तशी साधीच आहे, तसं पाहिलं तर काही वेगळं नाही. फक्त फेसबुकचा वापर किती चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो, याचाच एक नमुना म्हणजे ही बातमी आहे. (कृषिवल, दिनांक 15/11/2011)

Rate this:

ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन आणि काही प्रश्न…

ऊस हे राज्यातलं एक पूर्णपणे राजकीय पीक आहे. ऊसाची लागवड करण्यापासून ते कारख्यान्याला नेईपर्यंत सर्व काही राजकारण… दुसरं काहीच नाही. कारखान्याला ऊस घातल्यानंतरही त्यातलं राजकारण संपतच नाही. कारण साखर निर्माण झाल्यानंतरही त्याची विक्री आणि निर्यात वगैरे धोरणातही राजकारण असतंच की.. शिल्लक राहिलेली साखर, त्याची साठवण, खुल्या बाजारातली विक्री, कारखान्याच्या निवडणुका, सभासद, त्याची कर्जे, कार्यक्षमता, सरकारची […]

Rate this:

नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण

आज आपल्याकडे ट्वीटरवर असलेले राजकारणी कोण कोणते, तर सर्वात पहिलं नाव येतं, शशी तरूर याचं. पण शशी तरूर हे राजकारणात येण्याआधीपासानूच ट्वीटरवर सक्रीय आहेत, एवढंच नाही तर सध्या त्यांची फॉलोअर्सची संख्या देशात सर्वाधिक आहे. सत्तेच्या राजकारणातून म्हणजे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रीपदावरून पायउचार झाल्यानंतरही ते ट्वीटरवर तेवढेच सक्रीय आहेत, जेवढे पूर्वी होते. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही सातत्याने वाढतेच […]

Rate this:

अण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा शेवट…

अण्णा हजारे यांनी आपला ब्लॉग बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट या ब्लॉगसाईटवर असलेला अण्णा हजारे सेज हा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय अण्णांनी आज राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसंच या ब्लॉगवर त्यांचे माजी अधिकृत ब्लॉगर राजू परूळेकर यांनी टाकलेलं पत्र आपली सही नसल्यामुळे अधिकृत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Rate this:

मुद्दा आहे मराठीचा…..

निवडणूक मग ती मुंबई महापालिकेची असो की बिहारच्या विधानसभेची… मराठीचा मुद्दा कुठेही केव्हाही कॅश होतो. आता राज्यातल्या 196 नगरपालिकांसह फेब्रुवारी मध्ये पंधरा महापालिकांच्या निवडणुका आहेत. शहरी भाग असल्याने मनसे आक्रमक होईल. त्याची नांदी गेल्या काही दिवसात दिसलीय. विहार निवडणुकीच्या काळात जशी राहुल गांधींनी सुरूवात केली तशी आता संजय निरूपम यांनी केलीय, त्यांनी दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांना […]

Rate this: