मग एसटी तोट्यात का जाते?

एसटी महामंडळ आणि त्यांच्या वाहतूक व्यवसायाविषयी मला अनेक प्रश्न पडलेत… हे फक्त काही त्रोटक आहेत. या विषयावर खूप लिहायचं आहे, आता माझं एक प्रामाणिक मत असं तयार झालंय की एसटी ही कधीच प्रवाश्यांच्या सेवेसाठी नव्हती किंवा नसते, तर ते फक्त एक एक सरकारी महामंडळ किंवा व्यवसाय आहे, हा व्यवसाय फक्त कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आणि या महामंडळातल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी आहे. महामंडळाच्या व्यनवसायातून फक्त कर्मचारी आणि त्यांचे अधिकारी तसंच पदाधिकारी याचंच हित साधलं जातं.

– बस कंडक्टर कुणाही फुकट प्रवाश्याला आपल्या गाडीत नेत नाही, अगदी चाराणे कमी असतील तरीही त्याला गाडीतून उतरवलं जातं, म्हणजे प्रत्येक प्रवासी जर पैसे देऊनच प्रवास करतो तरीही एसटी महामंडळ तोट्यात का जाते…

– दोन शहरांमधील स्थानकांमधील अंतर ठरवण्याचा अधिकार सर्वे ऑफ इंडियाचा, मग एसटी कोणत्या अधिकारात दोन गावातील अंतर निश्चित करते, त्याची तिकीट आकारणी करते.

एस टी बस

– एसटी दावा करते त्या प्रमाणे प्रवाश्यांच्या सेवेसाठी की फक्त आपल्या फुकट्या कर्मचाऱ्यांच्या-अधिकाऱ्यांच्या​ सेवेसाठी

– आपल्या विधीमंडळातील (विधानसभा-परिषद) किंवा संसदेतील (लोकसभा-विधानसभेतील) नेमके कोणते सदस्य एसटीने प्रवास करतात. एसटी सुरू झाली तेव्हाची गोष्ट वेगळी असेल, आता 63 वर्षानंतरही खरोखरच आमदार-खासदार एसटीने प्रवास करतात का?

– सरकारने डिझेलच्या किंमतीत केलेली वाढ आणि एसटीने केलेली भाडेवाढ यामध्ये एवढी तफावत असूनही एसटी तोट्यात का जाते.

– एसटीच्या कामगार संघटना सतत तथाकथित अवैध वाहतुकीच्या नावाने बोटे मोडतात, तर खरोखरच राज्यातली सर्व प्रकारची अवैध आणि खाजगी वाहतूक पूर्णपणे – पूर्णपणे बंद केली तर प्रवाश्यांचा रेटा एसटीला पेलवेल का, एवढ्या प्रवाश्यांची वाहतूक करण्याची खरोखऱच एसटीची क्षमता आहे का?

– एसटी वाहतुकीत आरटीओचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात का, या निकषानुसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय गर्दीच्या हंगामात सर्वच एसट्या करतात त्या कायदेशीर असतात का?

– खाजगी गाड्यांना जर दोन स्थानकांमधील प्रवास एसटीच्या सध्याच्या प्रवासी भाड्याच्या निम्म्या किंमतीत अधिक आरामदायी बसच्या माध्यमातून परवडत असेल तर एसटीला ते का शक्य नाही, याचं कारण एसटीकडे असलेली अनावश्यक खोगीरभरती असेल का?

– एसटी महामंडळाचे अधिकारी सरकारकडून गोळा केल्या जात असलेल्या टोलवर नाराजी व्यक्त करतात दिसतात, एसटीसाठी टोलमाफी देण्याची वारंवार मागणी करते. खरं तर टोल हा प्रवासी भाड्यातून वसूल केला जातो, मग ज्या ठिकाणी टोल बंद झालाय, अशा ठिकाणी तिकीटाचे दर कमी का होत नाहीत

निमआराम बस
एसटी महामंडळाची निमआराम बस

पी के आण्णा पाटील एसटीचे अध्यक्ष असताना, एसटी फायद्यात आली असं सांगितलं जातं, त्यासाठी त्यांनी एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांचे वैद्यकीय भत्ते बंद केले, असंही एसटी फायद्यात येण्याचं कारण सांगितलं जातं, म्हणजे एसटी फक्त आजारी कर्मचाऱ्यांसाठीच प्रवाश्यांकडून पैसे घेऊन चालवली जाते का?

– एसटीला प्रवासी भाड्याव्यतिरिक्त इतर मार्गाने मिळणारं उत्पन्नाचा हिशेब कुठे असतो, म्हणजे जाहिराती मार्फत, दुकानांसाठी भाडेपट्टयावर दिलेले गाळे यामधूनही एसटीला कोट्यवधीचं उत्पन्न मिळतं, त्यामध्ये वाढ करून प्रवाश्यांना दिलासा का दिला जात नाही.

एसटीविषयी अनेक प्रश्न मला पडलेत. अजूनही बरेच आहेत.

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

5 Comments

 1. the main reason sighted by the authorities behind the losses ST is making (which is true but not it is not the only reason) is that ST operates its fleet at various remote locations irrespective of whether they can get full passanger load or not. Private operators ply only on the roads where they expect ample passanger load.

  However, this is not the only reason and this can not explain the huge losses of ST.
  (one suggestion is to really measure the cost-benefit anaysis in terms of monetory values on these remote location routes…) There are other reasons like (1) poor maintenance of vehicles (2) operating efficiency (3) turnover vs personnel cost ratio, etc which need to be addressed to make it a viable business.

  second suggestion is to have tier based fare…

 2. सुदीपजी, तुम्ही म्हणता ते खरे आहे.. एसटी तोट्यात जाण्यामागे जी अनेक कारणे आहेत, त्यामध्ये हे एक असू शकेल… तरीही मी त्याच्याशी पूर्णतः सहमत नाही… रिमोट परिसरात एसटी ज्या गा़ड्या वाहतुकीसाठी वापरते, त्यावर डिझेल वगळता काहीच खर्च होत नाही, मेन्टेनन्स अगदीच नगण्य… म्हणजे एशियाड म्हणजे निमआराम सेवेतल्या गाड्या, शहरात जिथे त्या फक्त दहा वर्षे वापरायच्या असतात, त्याचा पूर्ण वापर झाल्यानंतर तुम्ही म्हणता त्या रिमोट भागात वापरल्या जातात. म्हणजे त्याचं आयुष्य, क्षमता सर्व काही संपलेलं असतं, खऱ्या अर्थाने ही भंगारातली बस असते. फक्त त्यामध्ये डीझेल टाकून त्याचा वापर होतो. त्यामुळे तोटा होतो, असं उच्च रवाने सांगितलं जातं. पण ते खरं नाही… एसटी महामंडळ किफायशीरपणे चालण्यासाठी व्यवस्थापन सुधारणं आणि काही कठोर उपाय योजणं अत्यावश्यक आहे…

 3. i disagree with that 1) no vehicle is used beyond 9 years in S.T 2) In S.T. there are many expenses othe than diesel i,e Tyres ,springs , auto spares, batteries, In rurel areas as road condition is not so good many damages are there Patil sir pl go in details & then comment
  huge passenger tax and imposed uneconomical operation from politicians is one of the reasons “.पी के आण्णा पाटील एसटीचे अध्यक्ष असताना, एसटी फायद्यात आली असं सांगितलं जातं, त्यासाठी त्यांनी एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांचे वैद्यकीय भत्ते बंद केले, असंही एसटी फायद्यात येण्याचं कारण सांगितलं जातं, म्हणजे एसटी फक्त आजारी कर्मचाऱ्यांसाठीच प्रवाश्यांकडून पैसे घेऊन चालवली जाते का?” this statement is absurd medical allowances were never stopped .

  one retired employee

  0

 4. पांडुरंग जी, आपण निवृत्त एसटी कर्मचारी आहात, आपल्या प्रतिक्रियेबद्धल आभारी आहे… आपण माझ्या मुद्द्यावर सहमत नाही आहात, असू शकतं. तुमच्या प्रतिक्रियेचं स्वागत आहे. पी के अण्णा पाटील यांनी वैद्यकीय भत्ते कमी केले होते अशी माहिती माहिती आहे, ही माहिती एका एसटी कर्मचाऱ्यांकडून मिळाली होती… आजही एसटीमध्ये कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वैद्यकीय भत्त्याचं वाटप कशा प्रकारे होतं, याविषयी तुम्हाला माहिती असेलच.. त्याशिवाय एसटी महामंडळ तोट्यातच राहिलं पाहिजे, यासाठी काही अधिकारी आणि पदाधिकारी प्रामाणिक प्रयत्न करतात, अशीही माझी माहिती आहे. एसटी महामंडळ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांवर किती खर्च करतं, हा खर्च एकूण उत्पन्नाच्या किती टक्के असतो, अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांवर होणारा खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांवर होणारा खर्च, यासंदर्भातील एक आरटीआय मी लवकरच दाखल करणार आहे, त्यानंतर सगळी माहिती उजेडात येईलच…

  तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, कोणतीही एसटी बस नऊ वर्षापलिकडे वापरली जात नाही, या मताशी मी सहमत नाही… कारण नऊ वर्षांपूर्वीच्या कितीती बसेस प्रवाश्यांच्या सेवेत आहेत. आधी पुण्या-मुंबईत निमआराम वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेस नंतर खेडोपाडी जनता वाहतुकीसाठी वापरल्या जातात. तुमचा डेपो कोणता ते मला माहिती नाही… पण आमच्या बार्शी डेपोत माहिती घेतली तर कळेल की नऊ वर्षांपूर्वींच्या किती बसेस सध्या खेडोपाडी पाठवल्या जातात.

  एसटी ला तुम्ही म्हणता तसे डीझेलशिवाय टायर्स, सुटे भाग असे कितीतरी खर्च असतात, पण त्या सर्वांशिवाय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च सर्वाधिक असतो, हे ही तुम्हाला मान्य असेल. कर्मचारी आणि अधिकारी असा भेद मी या संदर्भात करत नाही. मी मुंबई सेट्रलला चालक वाहकांची विश्रांतीची ठिकाणे पाहिली आहेत. तिथे त्यांना मिळणाऱ्या सोई सुविधा मला माहिती आहे. जवळपास सर्व डेपोत अशीच स्थिती आहे… त्यामुळे कर्मचाऱ्यांविषयी विशेषतः चालक-वाहक यांच्याविषयी मला सहानुभूतीच आहे. पण अधिकारी किती नियोजनशून्य पद्धतीने दररोजचं कामकाज करतात, याचीही माहिती आहे. अव्यवसायिक पद्धतीने एसटीचं संचालन हेच एसटी तोट्यात जाण्याचं महत्वाचं कारण आहे,

  तुमच्याशी सहमत होण्याचा एकमेव मुद्दा uneconomical operation from politicians हा आहे.. पण त्याला अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत.

  या मुद्द्यावर अधिक चर्चा करायला मला आवडेल

 5. dear Megharajaji
  congratulation for taking note of my comments
  as i have worked for many years in S.T. at different levels I can understand & know little bit about that dept.I will try to clear some of you doubts.

  एसटी ही कधीच प्रवाश्यांच्या सेवेसाठी नव्हती किंवा नसते, तर ते फक्त एक एक सरकारी महामंडळ किंवा व्यवसाय आहे, हा व्यवसाय फक्त कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आणि या महामंडळातल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी आहे. महामंडळाच्या व्यनवसायातून फक्त कर्मचारी आणि त्यांचे अधिकारी तसंच पदाधिकारी याचंच हित साधलं जातं.
  This consept is applicable to all govt &semi govt dept. Govt will never finance any thing but it is ruled by I.P.S officer appointed by Govt who hardly work with this dept for 3 years.
  Except for salary & other allownces what हित was protected ??
  Distance between tow cities is decided after actual route survey & with the help of govt records of concern dept.
  एसटी दावा करते त्या प्रमाणे प्रवाश्यांच्या सेवेसाठी की फक्त आपल्या फुकट्या कर्मचाऱ्यांच्या-अधिकाऱ्यांच्या​ सेवेसाठी
  I dont understand meaning of this statement Do S.T. not allow any passenger?? Do you mean buses are all time travelling with their officers & employees?? some employees are no doubt taking privillage but it this a alltime truth ??

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: