काळ्या पैश्याचं काळं वास्तव

देशपातळीवर अण्णा हजारेंचं आंदोलन आणि जन लोकपाल विधेयक याची चर्चा सुरू असतानाच राज्य सरकारने रात्री तब्बल दीडच्या सुमारास जलविधेयक मंजूर करवून घेतलं. त्यासाठी झोपलेल्या आमदारांना पुन्हा सभागृहात आणण्यात आलं. काही सभागृहातच होते कारण त्यादिवशी महिला आरक्षण दुरूस्ती विधेयकासाठी सभागृह उशीरापर्यंत सुरू होतं. राज्यातला पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम बदलणाऱ्या सरकारच्या या प्रयत्नावर मोठी टीका झाली, त्यानंतर सत्तेतला भागीदार पक्ष काँग्रेसला जाग आली आणि त्यांनी पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम बदलणार नसल्याचं स्पष्ट केलंय. हा सर्व घटनाक्रम वेगवेगळ्या वृत्तपत्रातून टीव्ही चॅनेलमधून येऊन गेलाय.

सत्ताधारी पक्ष आपल्या आमदार संख्येच्या जोरावर हवे ते निर्णय कसे घेतात, यावर प्रकाश टाकण्यासाठीच हे सर्व पुन्हा एकदा सांगितलं.

निमित्त आहे यासंदर्भात आलेल्या पण एका वेगळ्या बातमीचं… म्हणजे “The Darker Side of Black Money” या पुस्तकाची.. हे पुस्तक माजी आयआरएस अधिकाऱ्याचं आहे. त्याचं नाव बी.व्ही.कुमार… ते इकॉनॉमिक इंटेलिजेन्स ब्युरोचे महासंचालक होते. त्यांनी आपल्या या पुस्तकात खासदार कसे मॅनेज होतात. हे लिहिलंय.

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात प्रस्तावित लोकपाल विधेयकावर चर्चा अपेक्षित आहे. पण मोठ मोठ्या उद्योगांकडून वेगवेगळ्या मार्गांनी निधी आणि इतर लाभ पदरात पाडून घेण्याची सवय लागलेले आपले खासदार खरोखरच किती गांभीर्याने प्रस्तावित लोकपाल विधेयकावकर चर्चा करतील, याविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

आमदार – खासदार, मंत्री-संत्री पैसे खातात, ही तर जनता जनार्दनाची सार्वकालिक भावना आहे. कारण आपल्या लोकप्रतिनिधीची कामे आणि व्यवहार या लोकभावनेशी सुसंगतच असतो. आता फक्त शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या एका सनदी अधिकाऱ्यानेही या पुष्टी दिलीय. या सनदी अधिकाऱ्याने स्वतः लिहिलेल्या पुस्तकात हा खुलासा केलाय. या पुस्तकाचं नाव आहे, “The Darker Side of Black Money” म्हणजे काळ्या पैश्याची काळी बाजू… आणि हे पुस्तक लिहिणारे माजी सनदी अधिकारी आहेत, बी.व्ही कुमार..

आपल्या पुस्तकात बी.व्ही. कुमार यांनी अनेक मोठमोठाले उद्योगसमूह सरकारी धोरण आपल्या उ्द्योगासाठी अनुकूल बनावीत, यासाठी सरकारी तसेच विरोधी पक्षांची बडदास्त ठेवतात, यावर प्रकाश टाकलाय. सत्ताधारी खासदारांचं लांगूलचालन करायचं कारण त्यामुळे सरकारी धोरणं आपल्या सोईची करून घेता येतात, तर विरोधी पक्षांच्या खासदारांची बडदास्त ठेवायची कारण संसदेतल्या चर्चेवेळी अशा धोरणांना विरोधकांनी कमीत कमी विरोध करावा. म्हणजेच या बड्या उद्योग समूहांसाठी खासदारांवर केला जाणारा खर्च हा निव्वळ खर्च नसून तो भविष्यातल्या यशासाठी केलेली गुंतवणूक असतो.

यामुळेच उद्योग समूहाकडून जास्तीत जास्त मोबदला मिळवण्यासाठी विरोधी पक्षांचे खासदार भ्रष्टाचाराविरूद्ध मोहीमा आखतात, आणि पुन्हा सत्तेत आल्यावर आपण केलेल्या आंदोलनाला सोईस्करपणे विसरून जातात.

यामुळेच हे खासदार निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर खर्च करायला मागे-पुढे पाहात नाहीत. कारण निवडून आल्यानंतर या खर्चाची भरपाई होणार, याची त्यांनी पूर्ण खात्री असते.

म्हणून निवडून येण्यासाठी कोणताही पक्ष त्यांना पुरतो, एका निवडणुकीत सत्ताधारी पक्षात असलेले नेते दुसऱ्या निवडणुकीत विरोधी पक्षात असतात, आणि एका पक्षातून हकालपट्टी झालेली असली तरी दुसऱ्या पक्षात त्यांचं एखाद्या विजयी योद्ध्याप्रमाणे स्वागत होत असतं.

वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांप्रमाणेच त्यांचे पक्षही भ्रष्टाचाराचा मोठा स्त्रोत असल्याचं बी. व्ही. कुमार सांगतात. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही अनेक राजकीय पक्ष आजही निवडणूक आयोगाकडे आपल्या वर्षभराच्या जमाखर्चाचा ताळेबंद दाखल करत नसल्याची माहिती त्यांनी या पुस्तकात दिलीय.

बी.व्ही कुमार यांच्या “The Darker Side of Black Money” या पुस्तकाला माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम.के. नारायणन यांनी प्रस्तावना लिहिलीय. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी सध्याची वेळ ही या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सर्वाधिक योग्य असल्याचं मत व्यक्त केलंय. परदेशात लवपून ठेवलेल्या काळ्यापैश्याविषयी तसंच देशात सध्या भ्रष्टाचारासंदर्भात एक लोकमत तयार होत असताना, अशा प्रकारचं आपल्या अनुभवांनी समृद्ध असलेलं माहितीपूर्ण पुस्तक वाचकांच्या हातात पडणं खरोखरच गरजेचं असल्याचं नारायणन यांनी म्हटलंय.

बी.व्ही.कुमार यांनी उलगडून दाखवलेलं काळ्या पैश्याचं काळ वास्तव समजून घेतलं की महाराष्ट्र सरकारच्याही अनेक निर्णयाचा उलगडा होतो. मग तो अन्नधान्यापासून मद्यनिर्मिती असो की पाणी वाटपाचा प्राधान्यक्रम बदलण्याचा असो… फक्त सत्ताधारीच नाही तर विरोधी पक्षांच्या आमदारांनीही सरकारच्टया निर्णयाला कशी संमती दिली असेल, याचा उलगडा होतो. तसं पाहिलं तर सरकार स्थापनेच्या काळात किंवा सरकार अस्थिर असण्याच्या काळआत आमदार-खासदारांची कशी बडदास्त ठेवली जाते, त्यांना कुठल्या कुठल्या रिसॉर्टवर नेऊन त्यांचे लाड कसे पुरवले जातात, याविषयीचं आश्चर्य आपोआपच कमी होतं…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

2 Comments

  1. Hey.. I read the news in the Indian express. Do you know the publication of the book or where to get this?
    You can send me the details on my mail id smitgade1@gmail.com

    Thanks

  2. हो, इंडियन एक्स्प्रेसप्रमाणएच starmajha.starnews.in वरही आहे ती बातमी, कुणीतरी कोणार्क प्रकाशन आहे म्हणे, त्याचा तपशील माहिती नाही

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: