सीने में जलन… आँखो में तुफां सा क्यूं हैं

भारतीय साहित्य जगतात शहरयार हे एक असं नाव आहे, ज्याची उर्दू कवितेच्या-शायरीच्या क्षेत्रातली सुरूवात साठच्या दशकात झाली. साठोत्तरी दशक म्हणजे सर्वच अर्थाने भारतीय साहित्यात नवनिर्माणाचं दशक आहे, मग मराठी असो की हिंदी किंवा उर्दू… साठच्या दशकाच्या सुरवातीला उर्दू शायरीच्या क्षेत्रात दोन प्रवाह होते. दोघांचे मार्ग वेगवेगळे आणि ध्येयही.. एक प्रवाह होता, जो बंडखोरांचा म्हणजे परंपरेला […]

Rate this: