तंत्रज्ञानाचा पत्रकारितेवर परिणाम

(विमर्श – या ठाण्यातून प्रकाशित होणाऱ्या त्रैमासिकासाठी हा लेख लिहिला होता…) टाईम्स ऑफ इंडियाच्या 17 डिसेंबरच्या अंकातली एक बातमी आहे. कॉम्प्युटर्स इमेजेस म्हणजेच व्हर्चुअल अँकर्स लवकरच खऱ्याखुऱ्या अँकर्सची जागा घेतील. अमेरिकेतल्या नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातल्या मॅककॉर्मिक स्कूल ऑफ इंजिनीयरिंग अँड अप्लाईड सायन्सेसच्या इंटेलिजेन्ट इन्फॉर्मेशन लॅब म्हणजे इन्फोलॅबमध्ये व्हर्च्युअल अँकर प्रोजेक्टवर काम सुरू आहे… टेक्स्ट अँड स्पीच टेक्नॉलॉजीवर […]

Rate this: